रिपोर्ट कार्ड: मुंबईतील विद्यमान खासदारांनी केलं काय? किती निधी वापरला आणि किती प्रश्न सोडवले?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:51 PM2024-03-27T16:51:51+5:302024-03-27T16:52:26+5:30
Loksabha Election 2024, Mumbai MP Report Card: मुंबईतील विद्यमान खासदारांनी गेल्या पाच वर्षात नेमकं केलं काय? असा प्रश्न जर एक मुंबईकर म्हणून तुम्हाला पडला असेल तर याची सविस्तर माहिती...
लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) घोषणा झाली असून विविध पक्षांकडून उमेदवारांचीही घोषणा केली जात आहे. मुंबईत लोकसभेच्या (Mumbai Loksabha Seats) एकूण ६ जागा असून यंदा या जागांसाठी राजकीय पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. यात यंदा काही विद्यमान खासदारांचंही तिकीट पक्षाकडून कापलं गेलं आहे. या सगळ्या रणधुमाळीत आपल्या मतदार संघाच्या विद्यमान खासदारानं गेल्या पाच वर्षात नेमकं केलं काय? असा प्रश्न जर एक मुंबईकर म्हणून तुम्हाला पडला असेल तर याची सविस्तर माहिती...
दक्षिण मुंबई
खासदार- अरविंद गणपत सावंत (७२), शिवसेना
काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा १ लाखाहून अधिक मतांनी पराभव केला होता.
लोकसभेतील उपस्थिती- ९१ टक्के
मतदार संघातील कामांवर केलेला खर्च- २४.०६ कोटी रुपये
लोकसभेत विचारलेले प्रश्न- २४५
चर्चासत्रातील सहभाग- १०९
पूर्ण केलेली सार्वजनिक कामं- ३९३
खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या निधीतील बहुतांश वाटा सार्वजनिक आरोग्य, पिण्याचे पाणी, बांधकामावर खर्च केला आहे.
दक्षिण मध्य मुंबई
खासदार- राहुल शेवाळे (५०), शिवसेना
काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा १.५२ लाख मतांनी केला होता पराभव.
लोकसभेतील उपस्थिती- ९४ टक्के
मतदार संघातील कामांवर केलेला खर्च- २५.६६ कोटी रुपये
लोकसभेत विचारलेले प्रश्न- ५३१
चर्चासत्रातील सहभाग- १४३
पूर्ण केलेली सार्वजनिक कामं- ३८२
दोनवेळा खासदार राहिलेला राहुळ शेवाळे सध्या शिंदे गटात आहेत. खासदार होण्याआधी नगरसेवक आणि मनपाच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. मतदार संघात त्यांनी मल:निसारण, आरोग्य, शिक्षण, क्रीडा या विभागांसाठी निधी खर्च केला आहे.
उत्तर-मध्य मतदारसंघ
खासदार- पुनम महाजन राव (४३), भाजपा
काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा १.३० लाख मतांनी पराभव केला होता.
लोकसभेतील उपस्थिती- ८६ टक्के
मतदार संघातील कामांवर केलेला खर्च- २६.१६ कोटी रुपये
लोकसभेत विचारलेले प्रश्न- ३०७
चर्चासत्रातील सहभाग- ०७
पूर्ण केलेली सार्वजनिक कामं- ४१६पूनम महाजन यांनी उत्तर-मध्य मतदार संघातील सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता कामांवर निधी खर्च केला आहे. तसंच रेल्वे, रस्ते, फूटपाथ आणि पुलांच्या कामावर खर्च केला आहे.
उत्तर पश्चिम मुंबई
खासदार- गजानन किर्तीकर (८०), शिवसेना
काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा २.६० लाख मतांनी पराभव केला होता.
लोकसभेतील उपस्थिती- ७१ टक्के
मतदार संघातील कामांवर केलेला खर्च- २४.३१ कोटी रुपये
लोकसभेत विचारलेले प्रश्न- ५८०
चर्चासत्रातील सहभाग- ४१
पूर्ण केलेली सार्वजनिक कामं- २८९
किर्तीकर यांनी खासदार कोट्यातील निधी मतदार संघात पिण्याचं पाणी, क्रीडा, सार्वजनिक आरोग्य या सुविधांवर खर्च केला आहे. तसंच पूल, रस्ते आणि रेल्वेशी संबंधित कामांसाठीही खर्च केला आहे.
उत्तर मुंबई मतदारसंघ
खासदार- गोपाळ शेट्टी (७०), भाजपा
काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांचा ४.६५ लाख मतांनी पराभव केला होता.
लोकसभेतील उपस्थिती- ९६ टक्के
मतदार संघातील कामांवर केलेला खर्च- २३.६९ कोटी रुपये
लोकसभेत विचारलेले प्रश्न- २९८
चर्चासत्रातील सहभाग- ११४
पूर्ण केलेली सार्वजनिक कामं- २४७
दोनवेळा खासदार राहिलेल्या गोपाळ शेट्टी यांनी निधीतील प्रमुख खर्च सार्वजनिक आरोग्य आणि मल:निसारण कामांवर केला आहे. त्यासोबतच क्रीडा, शिक्षण, पिण्याचं पाणी आणि इतर सुविधांवरही त्यांनी काम केलं आहे. यंदाच्या निवडणुकीत मात्र शेट्टी यांनी उमेदवारी देण्यात आलेली नाही.
उत्तर-पूर्व मतदारसंघ
खासदार- मनोज किशोरभाई कोटक (५१), भाजपा
राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा २.२६ लाख मतांनी पराभव केला होता.
लोकसभेतील उपस्थिती- ९८ टक्के
मतदार संघातील कामांवर केलेला खर्च- २५.२८ कोटी रुपये
लोकसभेत विचारलेले प्रश्न- ३६७
चर्चासत्रातील सहभाग- ५३
पूर्ण केलेली सार्वजनिक कामं- ३१९
पहिल्यांदा खासदार आणि तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या कोटक यांनी बहुतांश निधी सार्वजनिक सेवा, शिक्षण, क्रीडा आणि कुटुंब कल्याण योजनांवर खर्च केला आहे. मनोज कोटक यांना यावेळी उमेदवारी देण्यात आलेली नाही.
(source: PRS Legislative Research, Association for Democratic reforms, India Votes and MPLADS data)