मोदींचा रोड शो महायुतीच्या उमेदवारांसाठी धोकादायक; शरद पवारांच्या NCP चा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 03:26 PM2024-05-16T15:26:36+5:302024-05-16T15:27:19+5:30
अनेक ठिकाणी गर्दीमुळे या थांब्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. असे का केले गेले याचे स्पष्टीकरण विद्यमान महाराष्ट्र सरकारने मुंबईकरांना तातडीने दिले पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या घाटकोपर भागात रोड शो केला. परंतु या रोड शोमुळे मुंबईतल्या महायुतीच्या उमेदवारांची जागा धोक्यात आल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला आहे.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी म्हटलं की, घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांवर शोककळा पसरली असताना, त्याच परिसरात भाजपाने आपल्या नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुरू ठेवला. त्यात मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी भाजपने मेट्रो रेल्वे, लोकल गाड्या रद्द केल्या आणि रोड शोला सुरळीत मार्ग देण्यासाठी त्या भागातील रस्ते बंद करण्यात आले. मेट्रो रेल्वे आणि लोकल गाड्या का थांबवण्यात आल्या? अनेक ठिकाणी गर्दीमुळे या थांब्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो. असे का केले गेले याचे स्पष्टीकरण विद्यमान महाराष्ट्र सरकारने मुंबईकरांना तातडीने दिले पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
While the relatives of those who lost their lives in the tragic billboard collapse in Ghatkopar were mourning, the @BJP4India continued to hold the road show of their party leader, 'Narendra Modi ji' in the same vicinity.
— Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) May 16, 2024
To add 'Salt to the Wounds of Mumbikars, the BJP… pic.twitter.com/61WlIJJ604
तसेच एकंदरीतच हे सर्व चतुराईने आणि कुशलतेने केले गेले असावे, लोकांना 'रोड शो'च्या मार्गावरून घरी परतायला लावणे, 'मोदी रोड शो' मध्ये मोठा जनसमुदाय सहभागी होत आहे असा दाखवायचे हे प्रयत्नं होता. १६ लोकांचा जीव गमावून आणि अनेक जखमी होऊनही आपला कार्यक्रम सुरू ठेवण्याचा आणि नंतर हजारो प्रवाशांची गैरसोय करून भाजपाने केलेले हे असंवेदनशीलतेचे प्रदर्शन भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सर्व लोकसभा उमेदवारांसाठी मुंबई 'धोकादायक ठरेल. त्रस्त मुंबईकर आणि ज्यांना आता हे स्वार्थी असंवेदनशीलतेचे प्रदर्शन लक्षात आले आहे, ते भाजप ला २० मे'२४ रोजी मुंबईत मतदान होईल तेव्हा त्यांच्या या अक्षम्य कृत्याची किंमत मोजायला लागणार असंही त्यांनी सांगितले आहे.