Join us

बारामतीमधून विजय शिवतारे अपक्ष लढणार, कुणाची मत घेणार?; शरद पवारांनी मतांचं गणित सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 9:09 AM

लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत.

Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात आधी दुरंगी लढतीची चर्चा सुरू होती, पण आता शिवसेना नेते विजय शिवतारे यांनीही लोकसभा लढवण्याची घोषणा केली आहे. काल शिवतारे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपण अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. शिवतारे यांच्या उमेदवारीने दोन्ही पवारांचे गणित बिघडवणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिवतारे यांच्या उमेदवारीने कोणाच्या मतांवर परिणाम होणार अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, खासदार शरद पवार यांनी मतांचं समिकरण सांगितलं.  

भाजपने दोन राजघराण्यातील वंशजांना दिले तिकीट; त्रिपुराच्या 'महाराणी' आणि म्हैसूरचा 'राजा' पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात

शरद पवार म्हणाले, विजय शिवतारे हे विरोधी पक्षात होते. ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करतात. मागच्या निवडणुकीत त्यांनी चांगली मत घेतली आहेत, त्या आधीच्या निवडणुकीत ते निवडुनही आले आहेत. आता ते विरोधकांच्या संघटनेत गेल्या काही दिवसांपासून काम करत आहेत, त्यांनी आता लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बघू त्यांचा कोणावर काय परिणाम होतो. पण, त्यांना पडलेली मत ही महाविकास आघाडीची नाहीत महाविकास आघाडीच्या विरोधातील मत आहेत. त्यांची मत आणि कार्यकर्त्यांची संघटना ही विरोधकांची, असंही पवार म्हणाले.  

बारामती लोकसभा मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता शिवसेना नेत विजय शिवतारे यांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे. विजय शिवतारे हे शिवसेना नेते आहेत, त्यामुळे त्यांना पडणारे मत ही महायुतीची असणार असं बोलले जात आहे. 

निवडणूक लढणार असल्याची शिवतारेंची घोषणा

आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत. काल कार्यकर्त्यांचा मेळावा घेत शिवतारे यांनी त्यांची मते जाणून घेतली. त्यात कार्यकर्त्यांनी एकमताने विजय शिवतारेंनीबारामती लोकसभा निवडणूक लढवावी असा ठराव करत तो मंजूर केला.

बारामती लोकसभा मतदारसंघावर कुणाचा सातबारा नाही. यावर मालकी कुणाची नाही. त्यामुळे पवार पवार करण्याऐवजी आपला स्वाभिमान जागरूक करून लढलेच पाहिजे असा ठराव कार्यकर्त्यांनी केली. अजित पवारांनी २०१९ च्या निवडणुकीत खालची पातळी गाठली. मी लिलावती रुग्णालयात दाखल होतो. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी खोटं नाटकं करतोय, तू कसा निवडून येतो हे बघतोच असं अजित पवार म्हणाले होते. राजकारणात उर्मट भाषा त्यांनी केली होती. मी त्यांना माफ केले, महायुतीत आल्यावर स्वागत केले. परंतु उर्मट भाषा गेली नाही असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :शरद पवारशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसविजय शिवतारेअजित पवारलोकसभा