Join us

कर्करोगाच्या लसीसाठी अजून दीर्घ प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:06 AM

कर्करोगतज्ज्ञांचे मतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात कर्करोगाच्या ...

कर्करोगतज्ज्ञांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात कर्करोगाच्या उपचारादरम्यान केमोथेरपीच्या वेळीही त्रास सहन करावा लागतो. नुकताच बायोएनटेक कंपनीचे सीईओ डॉ. उगर साहिन आणि त्यांची पत्नी डॉ. ओझलेम ट्युरेशी या दाम्पत्याने कर्करोगावरील लस शोधल्याचा दावा केला होता. मात्र, या कर्करोगावरील लसीसाठी अजूनही दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञांनी सांगितले.

जर्मनीचे शास्त्रज्ञ डॉ. उगर साहिन आणि डॉ. ओझलेम ट्युरेशी २० वर्षांपासून कर्करोग उपचार पद्धतींवर संशोधन करत आहेत. त्यांनी कोरोनावर विकसित केलेली लस ‘एम- आरएनए’वर आधारित आहे. ‘एम-आरएनए’मुळे पेशींमध्ये प्रथिने निर्माण केली जातात. त्याद्वारे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेला सुरक्षित अँटीबॉडी तयार करायला प्रेरित केले जाते. याच तंत्रावर कर्करोगावर लस तयार केली जात आहे. कोरोनावर लस तयार करताना आम्ही ‘एम-आरएनए’वर आधारित कर्करोगावरील काही लसी तयार केल्या आहेत. लवकरच त्यांची क्लिनिकल ट्रायल होणार आहे.

कर्करोगावरील लस ही आरोग्यसेवा क्षेत्रासाठी क्रांती असेल. मात्र, ही लस प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी काही काळाचा अवधी लागेल. आपल्याकडील कर्करोगावरील उपचारांचे तंत्रज्ञान गेल्या काही वर्षांत बदलले आहे. सध्या कर्करोगाच्या उपचारांसाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन या पद्धती प्रामुख्याने वापरल्या जातात. रेडिएशन थेरपीमध्ये कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी अधिक ऊर्जा असलेला किरणोत्सर्गाचा समावेश असतो. रेडिएशन थेरपीची महत्त्वाची आणि सर्वांत जास्त वापरली जाणारी पद्धती म्हणजे एक्सर्टनल बीम रेडिएशन थेरपी (ईबीआरटी) ही आहे. यामध्ये शरीरातील कर्करोगग्रस्त उतींवर शरीराच्या बाहेरून किरणोत्सर्गांचे बीम लक्षित केले जातात. या कर्करोग उपचार पर्यायामध्ये रेडिएशनच्या डोसचा वापर हा कर्करोगग्रस्त पेशी नष्ट करण्यासाठी किंवा ट्युमरचा आकार कमी करण्यासाठी केला जातो. एक्सर्टनल बीम रेडिएशन थेरपीमध्ये ट्युमरवर उच्च ऊर्जेचे किरण लक्षित करण्यासाठी एक्स-रे मशीन ज्याला लिनिअर अ‍ॅक्सिलरेटर म्हणतात, ते वापरले जाते. या मशीनद्वारे कोणत्याही कोनातून ट्युमरवर रेडिएशन दिले जाते. हे मशीन रुग्णाला स्पर्श न करता शरीराभोवती फिरते. काही अद्ययावत उपकरणांमध्ये ट्युमरवर अधिक अचूकतेने लक्ष केंद्रित करता येते, ज्यामुळे आरोग्यदायी उतींवर आणि आजूबाजूच्या अवयवांवर होणारा प्रभाव कमी होतो. त्यामुळे उपचार संबंधीचे दुष्परिणामही कमी होऊ शकतात, अशी माहिती रेडिएशन ऑन्कोलाॅजिस्ट डॉ. प्रेरणा सिंग यांनी दिली आहे.

* सध्या प्रचलित पद्धतीनुसार उपचार

टाटा रुग्णालयाचे डॉ. श्रीपाद बाणावली यांनी सांगितले, मागील काही वर्षांपासून बायोएनटेक कंपनीच्या वतीने कर्करोगावरील लसीच्या संशोधनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सर्व अडथळे पार करुन प्रत्यक्षात रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत येण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे सध्या प्रचलित उपचार पद्धतीप्रमाणे कर्करुग्णांना उपचार दिले जातील.