मुंबई : वर्सोवा येथील यारी गल्ली मित्र मंडळाने यंदा अष्टविनायक मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे. यंदा सुमारे १०.३० फूट गणपतीची चांदीचा मुलामा दिलेली गणपतीची आकर्षक मूर्ती आरूढ झाली आहे. येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला येथील रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती यारी गल्ली मित्र मंडळाचे अध्यक्ष सतीश परब यांनी दिली.मंगेशकर घराणे या गावात येऊन विसावा घेऊन संगीताची आराधना करत. तसेच प्रसिद्ध संगीतकार दिवंगत श्रीनिवास खळे काकांचे वास्तव्य हीच वेसाव्याची ओळख. कालांतराने १९८० नंतर येथे लोकवस्ती वाढत जाऊन गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. पुढे वर्सोवा नावाने हा परिसर ओळखला जाऊ लागला. त्यानंतर वेसावे सामाजिक बांधिलकीचे प्रमुख केंद्र म्हणून परिचित झाले. सामाजिक बांधिलकी जपत आजच्या पिढीला महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती अवगत होण्यासाठी येथील मुला-मुलींना मोफत गड-किल्ले सफर, गुणगौरव समारंभ, विभागात स्वछता मोहीम, अद्ययावत व्यायामशाळा, मोफत वृत्तपत्र वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी बगीचा, महिला मंडळासाठी मोदक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदींचे सातत्याने वर्षभर आयोजन केले जाते. सतीश परब यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश रासम, ॠषीकेश कामत, बाळकृष्ण व रमेश टोपले बंधू, मयूर भेकरे, आशुतोष कलाल, राजेंद्र जोशी, उमेश साळवी, शांताराम नेवरेकर, विशाल वाडकर, अशोका पुजारी, हेमंत सावंत, प्रकाश म्हात्रे आदींचे सातत्याने मोलाचे सहकार्य मिळत आहे. (प्रतिनिधी)
अष्टविनायकाचा देखावा
By admin | Published: September 13, 2016 4:36 AM