मुंबई-
राज्याच्या विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये जोरदार राडा झाला. एकमेकांच्या अंगावर धावून जाणाऱ्या आमदारांमध्ये शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची नावं प्रामुख्यानं समोर आली. घडलेल्या घटनेवरुन अमोल मिटकरी यांनी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी शिवीगाळ केल्यामुळे वातावरण चिघळल असा आरोप केला. त्यावर आता आमदार शिंदे यांनीही मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
PHOTOS: विधानभवनातील राड्याचे हे फोटो पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल, 'यासाठी निवडून दिलं होतं का?'
आम्ही लोकशाहीतील अधिकारानुसार शांततेनं विधानभवनाच्या पायऱ्यांवर ते येण्याआधीपासूनच आंदोलन करत होतो. अनिल देशमुखांचे १०० खोके, बारामती एकदम ओके अशा घोषणा आम्ही देत होतो. या त्यांच्या जिव्हारी लागल्याचं दिसलं. अमोल मिटकरी यांनीच अर्वाच्य भाषेत बोलायला सुरुवात केली, असा आरोप आमदार महेश शिंदे यांनी केला.
Video: मिटकरी अन् रोहित पवार जोरजोरात ओरडले, धक्काबुक्कीमुळे विधानसभेत वातावरणं तापले
"गेल्या चार दिवसांपासून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आमच्याबाबत ५० खोके, एकदम ओके अशा घोषणाबाजी करण्यात येत होत्या. आम्ही काही न बोलता बाजूनं जात होतो. पण आज जेव्हा आम्ही गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीकडून केल्या गेलेल्या भ्रष्टाचाराबाबत बोललो तर त्यांना चांगलंच झोंबलेलं दिसतंय. जे अमोल मिटकरी ५० खोके ओरडत आहेत. त्यांना माझं आव्हान आहे की गेल्या अडीच वर्षात अजित पवार यांनी बारामतीला किती पैसा पाठवला याची माहिती घ्यावी मग खोके खोके ओरडावं", असं महेश शिंदे म्हणाले.
'५० खोके, एकदम ओके'वरून राडा! विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे गट-राष्ट्रवादीचे आमदार भिडले
अमोल मिटकरी लोकशाहीवादी नाहीतआई-बहिणीवरुन शिवीगाळ केली गेल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी महेश शिंदे यांच्यावर केला. अमोल मिटकरी कोणत्यापद्धतीची विधानं करत असतात त्याची कल्पना संपूर्ण महाराष्ट्राला आहे. त्यामुळे मला त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही. आम्ही शांततेनं आंदोलन करत होतो. पण मिटकरी यांनी आम्हाला चिथवण्याचं काम तिथं सुरू केलं. मिटकरी हे लोकशाहीवादी नेते नाहीत. त्यांची विचारसरणी सर्वांना माहित आहे. माझी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की त्यांनी अमोल मिटकरींच्या वागण्याकडे लक्ष द्यावं, असं महेश शिंदे म्हणाले.