मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसरात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक केलेल्या व्यक्तींमध्ये एकही विद्यार्थी नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, अटक केलेल्या 10 लोकांपैकी 3 जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तर, दुसरीकडे पोलिसांच्या वेशातही एबीव्हीपीचे कार्यकर्ते घुसल्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही एक फोटो शेअर करुन यास दुजोरा दिला आहे.
देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली असून संपूर्ण देशात जयभीमची घोषणाबाजी होत आहे. पण, सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला करण्याचं काम भाजपाकडून होत आहे. रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईला केवळ लोकशाहीला वाचवायची आहे, त्यासाठीच ते रस्त्यावर उतरले आहेत. देशातील विद्यार्थी एकत्र आले आहेत, त्याचीच भिती भाजपाला वाटत आहे. पण, विद्यार्थ्यांचं आंदोलन जेव्हा एकत्र येतं, तेव्हा सत्तातर होतं, असे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटंलय. आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे.
आव्हाड यांनी आपल्या अकाऊंटवरुन दोन फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये पोलिसांच्या वेशात जिन्स आणि टीशर्ट घाततेला एक युवक आंदोलकांना विरोध करत आहे. मात्र, या युवकाचं फेसबुक प्रोफाईलचा दुसरा फोटोनुसार तो एबीव्हीपीचा पदाधिकारी असल्याचं सिद्ध होतंय. त्यावरुन पोलिसांच्या वेशात आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करणारे हे भाजपाचे समर्थक असल्याचं आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवरुन सूचवलंय. तसेच, पाहा फोटो पाहा, तुम्हाल कळलंच असेल, या हिंसक घटनांमागे कोण आहे, असे आव्हाड यांनी म्हटलंय.