Join us

परदेशी प्रवाशांनी शाेधल्या पळवाटा; क्वारंटाइन टाळल्याने धाेक्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2021 2:31 AM

Corona Virus : ब्रिटन, युरोप, मध्य पूर्व व दक्षिण आफ्रिका या देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांची २१ डिसेंबरपासून मुंबई विमानतळावर तपासणी केली जात आहे. यापैकी महाराष्ट्राबाहेरील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा प्रसार टाळण्यासाठी मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, सात दिवसांचे क्वारंटाइन टाळण्यासाठी इतर राज्यांतील विमानतळावर उतरून महाराष्ट्र, मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे परदेशी प्रवास करून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला त्या-त्या विमानतळावर क्वारंटाइन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

ब्रिटन, युरोप, मध्य पूर्व व दक्षिण आफ्रिका या देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांची २१ डिसेंबरपासून मुंबई विमानतळावर तपासणी केली जात आहे. यापैकी महाराष्ट्राबाहेरील प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. तर अन्य प्रवासी मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहेत. हॉटेलमध्ये सात दिवस राहणे परवडत नसलेल्या प्रवाशांच्या मागणीनुसार महापालिकेने भायखळा येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये त्यांची विनामूल्य व्यवस्था केली आहे. सात िवसानंतर ज्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असेल त्यांना घरी पाठवण्यात येत आहे, तर ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असेल त्यांच्यावर  कोविड सेंटरमध्ये उपचार केले जात आहे. 

मुंबई, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी गेले अनेक महिने प्रचंड मेहनत घेण्यात आली. २५ नोव्हेंबर २०२० नंतर राज्यात आलेल्या प्रवाशांचाही शोध सुरू आहे. यापैकी मुंबईत पाच रुग्णांमध्ये ब्रिटनचा स्ट्रेन आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील लोकांचाही शोध घेण्यात येत आहे. परंतु, इतर राज्यांतील विमानतळावर उतरून देशांतर्गत प्रवास करीत महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांचा शोध घेणे शक्य नाही. यामुळे मुंबई, महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी अन्य राज्यांतील क्वारंटाइनचे नियम कडक असावे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले........ 

संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि नवीन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अन्य राज्यांत व देशाबाहेर प्रवास केलेल्या व्यक्तींचे विलगीकरण करणे महत्त्वाचे आहे. यात केवळ राज्य शासनाने मुंबईत विलगीकरण न करता अन्य राज्यांतील यंत्रणांनीही खबरदारी बाळगून त्या त्या राज्यात विलगीकरण कालावधी पूर्ण करणे गरजेचे आहे. संसर्ग नियंत्रणाच्या प्रक्रियेत अलगीकरण व विलगीकरणाचा मोठा वाटा आहे, त्यामुळे याची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.- डॉ. शशांक जोशी, सदस्य, राज्य कोविड १९ टास्क फोर्स

विदेशातून येणारे अशी लढवतात शक्कलn ब्रिटन, युरोप, मध्य पूर्व व दक्षिण आफ्रिका या देशांतून येणारे प्रवासी क्वारंटाइन टाळण्यासाठी थेट मुंबई विमानतळावर उतरण्याऐवजी अहमदाबाद, दिल्ली, बंगळुरू अशा ठिकाणच्या विमानतळावर उतरतात.n तेथून ते देशांतर्गत विमानसेवेने मुंबई अथवा राज्यातील इतर विमानतळावर उतरतात. त्यामुळे ना त्यांची चाचणी होते, ना त्यांना क्वारंटाइन केले जाते. n अशाच पळवाटा शोधून आलेल्या आठ प्रवासी रुग्णांमध्ये ब्रिटनचा स्ट्रेन आढळून आला आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या