एकाच दिवशी चार महिलांना लुटले

By admin | Published: June 24, 2014 12:46 AM2014-06-24T00:46:48+5:302014-06-24T00:46:48+5:30

शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरीला आळा बसावा, यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ केली

Loot four women in a single day | एकाच दिवशी चार महिलांना लुटले

एकाच दिवशी चार महिलांना लुटले

Next
>मुंबई : शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरीला आळा बसावा, यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ केली असली तरी रविवारी शहरात सोनसाखळी चोरांनी चार महिलांना लुटत तब्बल पाच लाखांचे सोने घेऊन पळ काढला.
मीरा रोड येथे राहणा:या सुहासिनी सकपाळ काल दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नातेवाइकांसह मालाड येथे लग्नासाठी जात होत्या. मीरा रोड येथून ही सर्व मंडळी त्यांच्या ओम्नी कारने मालाडच्या दिशेने येत असतानाच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील साईधाम मंदिर येथे दुचाकीवरून दोन लुटारू आले. सकपाळ या कारमध्ये खिडकीजवळच बसलेल्या असल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या लुटारूने चालत्या गाडीत त्यांच्या गळ्यातील 1 लाख 9क् हजारांचा हार घेऊन धूम ठोकली. याबाबत सकपाळ यांनी समतानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
याच दरम्यान दुसरी घटना दादर परिसरात घडली. त्यात लुटारूंनी हेमलता हटकर या महिलेच्या गळ्यातील 5क् हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास हटकर प्रभादेवीच्या आदर्शनगर परिसरातून पायी जात असताना ही घटना घडली. भांडुपमधील प्रतापनगर येथे राहणा:या शोभा परब (6क्) या वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरल्याची घटना साडेतीन वाजण्याच्या दरम्यान वरळी परिसरात घडली. महिला आदर्शनगरकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील हा ऐवज हिसकावून पळ काढला. 
 सायंकाळी 4 वाजता अशाच प्रकारे माहीम येथे राहणा:या ऊर्मिला तांबोरे या एका नातेवाइकाच्या लग्नासाठी जात असताना सेनापती बापट मार्गावर दोन लुटारूंनी अडवून त्यांच्या गळ्यातील 94 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि 94 हजारांची सोनसाखळी असे 1 लाख 88 हजारांचे दागिने घेऊन पळ काढला. 
या घटनेनंतर तांबोरे यांनी आरडाओरडा केला. मात्र तोर्पयत लुटारू पसार झाले होते. याबाबत माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेऊन तपास सरू केला आहे. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Loot four women in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.