लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात असताना अधिकारी मात्र लूट करीत आहेत. अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी मिळणारे पेट्रोल बाजारात विकण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेने केला आहे. त्यानुसार या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश बेस्ट समितीने दिले. बेस्टच्या श्रेणी ‘ए’ मधील अधिकाऱ्यांना ६५ लीटर व श्रेणी ‘बी’च्या अधिकाऱ्यांना दरमहा २0 लीटर पेट्रोल मिळत असते. मात्र हे अधिकारी पेट्रोलची विक्री करून पैसे कमवत असल्याचा आरोप शिवसेनेचे सदस्य राजेश कुसळे यांनी बेस्ट समितीच्या बैठकीत केला. बेस्ट आर्थिक संकटात असताना अधिकारी असे लूट करीत असल्याचा तीव्र संताप बेस्ट समितीने व्यक्त केला. तसेच या प्रकरणाची दक्षता खात्यामार्फत चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली.
बेस्ट अधिकाऱ्यांकडून पेट्रोलची लूट
By admin | Published: June 16, 2017 2:45 AM