इंग्रजी सिनेमा पाहून रचला लुटीचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:51 AM2018-05-17T01:51:03+5:302018-05-17T01:51:03+5:30

गुन्ह्यांवर आधारित इंग्रजी सिनेमा पाहून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नोकराने मित्राच्या मदतीने चक्क पतसंस्था लुटण्याचा डाव रचला.

Looted by English cinema | इंग्रजी सिनेमा पाहून रचला लुटीचा डाव

इंग्रजी सिनेमा पाहून रचला लुटीचा डाव

Next

मुंबई : गुन्ह्यांवर आधारित इंग्रजी सिनेमा पाहून हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नोकराने मित्राच्या मदतीने चक्क पतसंस्था लुटण्याचा डाव रचला. मात्र, प्रयत्न फसला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली.
सोहनकुमार दानसिंग, मनीषकुमार राजबहादूर मौर्या अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही एका हॉटेलमध्ये नोकरीला आहे. यापैकी गेल्या आठवड्यातच सोहनने गुन्ह्यांवर आधारित इंग्रजी सिनेमा पाहिला. याच सिनेमातील बँक लुटीच्या दृश्याने त्याच्या मनावर इतका परिणाम झाला की, त्यानेही बँकेवर दरोडा टाकण्याचे ठरविले.
सुरुवातीला आईचे खाते असलेली घाटकोपर पश्चिमेकडील मनशांती नागरी सहकारी पतसंस्था त्याने निवडली. आठवडाभरात पतसंस्थेतील कामकाजाची माहिती घेतली. आणखी दोन ते तीन बँकांमध्ये रेकीही केली.
यापैकी आईचे खाते असलेली पतसंस्थाच सर्वदृष्ट्या सोईस्कर ठरणार असल्याने त्याने त्याकडे लक्ष केंद्रित केले. यासाठी हॉटेलमध्ये काम करणाºया मित्र मनीषची मदत
घेतली. झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडून मनीषही त्यात सहभाग घेतला.
नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री १०च्या सुमारास पतसंस्थेतील रोखपाल दिवसभरात गोळा झालेल्या रकमेची मोजदाद करीत होते. त्याचदरम्यान दोघेही हत्यारांसह पतसंस्थेत घुसले. त्यांनी चाकूच्या धाकाने रोखपालांना धमकावले. या झटापटीत रोखपाल जखमी झाले. त्यामुळे पकडले जाण्याच्या भीतीने हाती आलेली रक्कम घेऊन त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पतसंस्थेतील कर्मचाºयांनी आरडाओरड करीत या लुटारूंचा पाठलाग सुरू केला. याच दरम्यान गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने या लुटारूंना पकडण्यात आले.
त्यांच्या चौकशीत वरील घटनाक्रम उघडकीस आला.
या प्रकरणी दोघांकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी दिली.

Web Title: Looted by English cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.