Join us  

अशी लुटली पालिकेची तिजोरी

By admin | Published: July 06, 2016 1:30 AM

मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी तयार झालेला मास्टर प्लॅन महापालिकेची तिजोरीच साफ करण्याचा प्लॅन ठरला आहे़ ३५२ कोटी रुपयांच्या या घोटाळ्याने राजकीय वादळ उठले़

मुंबई : मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी तयार झालेला मास्टर प्लॅन महापालिकेची तिजोरीच साफ करण्याचा प्लॅन ठरला आहे़ ३५२ कोटी रुपयांच्या या घोटाळ्याने राजकीय वादळ उठले़ कनिष्ठ अभियंतापासून वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच यात गुंतले असल्याने याप्रकरणाची अभियंत्यांना अटक झाली, तरी ठेकेदार मोकाटच होते़ काळ्या यादीत टाकूनही या ठेकेदारांना कोट्यवधी किंमतीचे कंत्राट बक्षीस मिळाले़ निकृष्ट दर्जाचे काम करुनही या ठेकेदारांना करोडोंचे कंत्राट मिळते़ आयुक्त अजय मेहता यांनी नेमलेल्या समितीने आपल्या अहवालातून दक्षता खाते, रस्ते विभाग आणि प्रशासकीय अधिकाऱ्यावरही ठपका ठेवला़ त्यानुसार रस्ते व दक्षता खात्यातील अधिकाऱ्यांचे निलंबन, थर्ड पार्टी आॅडिट कंपनीच्या १२ अभियंत्यांना अटक करण्यात आली़ मात्र निविदांच्या निकषांमध्ये बदल करणाऱ्या बड्या अधिकाऱ्याची सरकारी नियमांनुसार आणि ठेकेदारांना करोडोंच्या कंत्राटाची खिरापत सुरुच राहिली़ यापैकी एका ठेकेदाराला मेट्रो प्रकल्पाचे कंत्राट तर काहींना पूल बांधण्याचे कंत्राट मिळून त्यांचे दुकाने सुरुच राहिले़ (प्रतिनिधी)३५२ कोटी रुपयांचा घोटाळा साडेसात हजार कोटी रुपये खर्च करुन काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात येत आहेत़ मात्र ३४ रस्त्यांच्या चौकशीत सरासरी ३८ ते १०० टक्के अनियमितता आढळून आली़ असा ठपकाच पालिकेच्या चौकशी समितीने ठेवला़ सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे़ २०१३ ते २०१५ मध्ये दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांची चौकशी यात होणार आहे़या ठेकेदारांची मक्तेदारी चौकशीच्या पहिल्या टप्प्यात दोषी ठरलेले ठेकेदार के़ आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन यांना काळ्या यादीत टाकणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले़ मात्र काहींना पुलाचे कंत्राट तर जे़ कुमारला मेट्रो प्रकल्प तीनचे कंत्राट मिळाले आहे़मोठे मासे गळाला नाहीचअटक करण्यात आलेले हे खाजगी आॅडिट कंपनीचे अधिकारी आहेत़ या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले ठेकेदार मात्र मोकाटच आहेत़ मोठे मासे अद्याप गळाला लागलेले नाहीच़ या ठेकेदारांनी भाजपामार्फत दबाव आणून कारवाईला ब्रेक लावला आहे, असा आरोपही झाला़