ऑनलाइन लोकमत
ठाणे: नौपाडयातील एका घरातून 175 कोटी रुपयांचे अमेरिकन चलन अर्थात एक लाख 19 हजार रुपये, दहा हजार 5क्क् चे युवान चीनी नाणी आणि सात हजार रुपये भारतीय चलन असा एक लाख 36 हजारांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पाचपाखाडीतील व्यापा:याने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मोलकरणीच्या मुलीवरच त्याने संशय व्यक्त केला आहे. पाचपाखाडीतील अमर ज्योती सोसायटीतील दुस:या माळयावरील या घरातून 26 जून रोजी रात्री 8 ते 2 जुलै रोजी सकाळी 7.3 वा. च्या सुमारास ही घटना घडली. या घरातून बुटाच्या आकाराच्या पिगी बॅगमधून डिजिटल कॅमे:यासह हा ऐवज चोरल्याचे या व्यापा:याच्या निदर्शनास आले. तेंव्हा त्यांनी याप्रकरणी 3 जुलै रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोलकरणीची मुलगी या घरात कामावर आल्यानंतरच हा प्रकार घडल्यामुळे त्यांनी तिच्यावर संशय व्यक्त केला आहे. अर्थात, यातील तथ्यता पडताळली जात असल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक बी. डी. सुलताने हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.