‘आयात केलेला कांदा वेळेवर न दिल्याने नुकसान’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 04:22 AM2020-02-06T04:22:10+5:302020-02-06T04:22:14+5:30
कांद्याचे दर शंभर ते दीडशे रुपये किलो झाल्यावर केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून कांदा आयात केला.
मुंबई : कांद्याचे दर शंभर ते दीडशे रुपये किलो झाल्यावर केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लादून कांदा आयात केला. मात्र, आयात केलेला कांदा वेळेवर रेशन दुकानदारांना विक्रीसाठी देण्याची गरज होती. मात्र, तसे करण्यात आले नाही. परिणामी, हा कांदा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये खराब झाला. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा आरोप रेशन दुकानदारांनी केला आहे.
कांदा महाग झाल्याने त्याची विक्री रेशन दुकानांद्वारे करण्यासाठी आयात केलेला कांदा त्वरित रेशन दुकानदारांना देण्याची गरज होती. मात्र, तसे न झाल्याने हा कांदा आता कुजला. परिणामी, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप मुंबई रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष नवीन मारू यांनी केला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला आहे. रेशन दुकानदारांना हा कांदा वेळेवर देण्यात आला असता, तर कांदा गरिबांना खरेदी करता आला असता व वाया गेला नसता, असे मारू म्हणाले.