परिवहनचा तोटा, ‘बेस्ट’साठी घाटा

By admin | Published: April 1, 2016 02:47 AM2016-04-01T02:47:50+5:302016-04-01T02:47:50+5:30

परिवहन विभागाचा तोटा वीज ग्राहकांच्या बिलातून वसूल करण्याचा नियम आणखी काही वर्षे सुरू ठेवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतल्यामुळे वीज ग्राहक भविष्यात टाटा कंपनीकडे

Loss of transport, loss for 'best' | परिवहनचा तोटा, ‘बेस्ट’साठी घाटा

परिवहनचा तोटा, ‘बेस्ट’साठी घाटा

Next

मुंबई : परिवहन विभागाचा तोटा वीज ग्राहकांच्या बिलातून वसूल करण्याचा नियम आणखी काही वर्षे सुरू ठेवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतल्यामुळे वीज ग्राहक भविष्यात टाटा कंपनीकडे वळण्याची भीती बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी आज व्यक्त केली़
अध्यक्षपदाच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी दुधवडकर यांनी समारोपाच्या भाषणातून ही चिंता व्यक्त केली़ बेस्टच्या तिकिटांच्या दरांमध्ये दोन वेळा वाढ व एप्रिलपासून वीज दरवाढ व टीडीएलआरच्या माध्यमातून महसूल मिळूनही उपक्रमाची तूट कमी झालेली नाही़ बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारण्यात अपयश आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़
२०१६ ते २०२० पर्यंतच्या बहुवार्षिक दरपत्रकामध्ये टीडीएलआरचा समावेश करण्यात येणार आहे़ वीज ग्राहकांकडून वसूल होणारी परिवहन तूट बेस्ट उपक्रमावर उलटण्याची शक्यता आहे. टाटा वीज कंपनीचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध असल्याने टीडीएलआर रद्द करण्याचा विचार प्रशासनाने करावा, अशी सूचना त्यांनी केली़ (प्रतिनिधी)

खासगीकरणाचे आव्हान
सार्वजनिक परिवहन सेवेत खासगी बस सेवेला मुभा देण्याचा प्रस्ताव या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आला आहे़ यास मंजुरी मिळाल्यास बेस्ट उपक्रमाचे आर्थिक गणित कोलमडेल, अशी भीती दुधवडकर यांनी व्यक्त केली़ या प्रस्तावात दुरुस्ती करण्याची मागणी मुंबई आणि ठाण्यातील सर्व खासदारांनी केली आहे़

3,000 कोटींची मागणी
बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी तीन हजार कोटी रुपयांची मागणी दुधवडकर आणि महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे़

‘टीडीएलआर हाच पर्याय’
दहा लाख बेस्ट ग्राहकांकडून परिवहन तूट वसूल करण्यात येते. बेस्ट उपक्रमाची आर्थिक तूट भरून काढण्यास टीडीएलआर प्रमुख पर्याय असल्याचे प्रशासन सांगते.

Web Title: Loss of transport, loss for 'best'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.