मराठमोळ्या संस्कृतीची गुढी...!

By admin | Published: April 9, 2016 02:40 AM2016-04-09T02:40:24+5:302016-04-09T02:40:24+5:30

रांगोळ्यांचे गालिचे, झेंडूची तोरणे, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीमचा नाद, झिम्मा-फुगड्यांच्या गिरक्या, नऊवारी साड्या, फेटे, रस्तोरस्ती ‘अवतरलेले’ शिवाजी महाराज, जिजाऊ, बाजीराव-मस्तानी

A lot of Maratha civilization ...! | मराठमोळ्या संस्कृतीची गुढी...!

मराठमोळ्या संस्कृतीची गुढी...!

Next

रांगोळ्यांचे गालिचे, झेंडूची तोरणे, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीमचा नाद, झिम्मा-फुगड्यांच्या गिरक्या, नऊवारी साड्या, फेटे, रस्तोरस्ती ‘अवतरलेले’ शिवाजी महाराज, जिजाऊ, बाजीराव-मस्तानी, सराईतपणे समशेर पारजणाऱ्या रणरागिणी, मराठी संस्कृतीची धज्वा आसमंतात उंचावणारी ध्वजपथके, बाइकस्वार आणि घोडेस्वार... अशा ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाने शुक्रवारी मुंबईचे रस्ते ‘जाम’ झाले होते. नववर्ष स्वागतयात्रांची सुरुवात ज्या डोंबिवली, ठाणे, गिरगावातून झाली तिथल्या रस्त्यांवर तर अबालवृद्धांनी गर्दी केली होती, पण शहराच्या अन्य भागांतही लहान-मोठ्या स्वागतयात्रा काढण्यात आल्या. अनेक संस्थांनी या माध्यमातून सामाजिक संदेश दिला. तरुणांनी सेल्फी काढून हे संस्मरणीय क्षण चिरंतन केले. मराठमोळी संस्कृती, लोककला, वेशभूषा यामुळे अवघे शहर उत्सवमय झाले होते....
मुंबई : गिरगावात स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आणि शिवसेना अशा दोन स्वागतयात्रा निघाल्या होत्या. सकाळी साडेसातच्या सुमारास गिरगाव चर्चपासून शिवसेनेची यात्रा निघाली. तर स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची यात्रा गिरगावातील फडके गणपती मंदिरापासून सुरूझाली. सुरुवातीला विविध क्षेत्रांतील ११ महिलांनी गुढीचे पूजन केले आणि स्वागतयात्रेची सुरुवात झाली. युवा प्रतिष्ठानच्या स्वागतयात्रेत मराठीतील कलाकार सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांची सभा ठाकूरद्वार नाक्यावर भरली होती. त्या वेळी प्रचंड गर्दी झाली. गर्दीचे नियोजन करताना पोलिसांचीही तारांबळ उडाली. स्वागतयात्रेत सहभागी झालेले तरुण सेल्फी काढत होते. ध्वजपथक आणि ढोलपथकाने सर्वांची मने जिंकली. गिरगावचा राजा महिला पथकातील मुलींनी नऊवारी साड्या नेसून मानवी मनोरा उभारून मानवंदना दिली.
‘स्त्रीशक्ती अपरंपार’ ही यंदाची संकल्पना होती. ‘नारी के सहभाग विना कोई बदल नही हो सकता’ असे नारे दिले गेले. गिरगावच्या स्वागतयात्रेत महिलाशक्ती मोठ्या प्रमाणात दिसून आली. लहान मुलांनी स्केटिंगची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांना थक्क केले. गोराईमध्येही जल्लोष
बोरीवली येथील गोराई परिसरामध्येही गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त मोठ्या जल्लोषात शोभायात्रा पार पडली. तरुणाईच्या पुढाकारातून कोणतेही प्रायोजकत्व न घेता
स्वयम् युवा प्रतिष्ठान आणि
आम्ही मावळे यांच्या संयुक्त
विद्यमाने सलग ७व्या वर्षी ही शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती.
सर्व तरुणाई पारंपरिक वेशभूषेत ध्वजपथक, ढोलपथक, लेझीमपथक आणि ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. शिवाय या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थ यांच्यावर आधारित दोन विशेष चित्ररथही साकारण्यात आले होते. ढोलपथकाच्या दणकेबाज सादरीकरणाला, ध्वजपथकाचा ठेका आणि सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचा होत असलेला जयघोष यामुळे संपूर्ण वातावरण उत्साहाचे झाले होते.
या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने गोराईकरांनी सहभाग घेत तरुणाईच्या उपक्रमाला उत्स्फूर्र्त पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे बोरीवली पोलिसांचे मोलाचे सहकार्यही या वेळी तरुणांना मिळाले.

Web Title: A lot of Maratha civilization ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.