शिवसेनेच्या सत्तेपुढे सर्वांचे लोटांगण

By admin | Published: May 20, 2015 10:48 PM2015-05-20T22:48:39+5:302015-05-20T22:48:39+5:30

शिवसेनेच्या सत्तेला छेद देण्याचा प्रयत्न करत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन विकास आघाडी स्थापन केली. अपक्ष नगरसेविकेला सोबत घेऊन नगराध्यक्षपदासाठी अर्जही दाखल केला.

Lot of people all over Shiv Sena's power | शिवसेनेच्या सत्तेपुढे सर्वांचे लोटांगण

शिवसेनेच्या सत्तेपुढे सर्वांचे लोटांगण

Next

पंकज पाटील - अंबरनाथ
शिवसेनेच्या सत्तेला छेद देण्याचा प्रयत्न करत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन विकास आघाडी स्थापन केली. अपक्ष नगरसेविकेला सोबत घेऊन नगराध्यक्षपदासाठी अर्जही दाखल केला. मात्र सत्ता स्थापन करणे अवघड दिसताच याच आघाडीतील घटक पक्षांनी शिवसेनेपुढे लोटांगण घातले. मात्र, सेनेला समर्थन देण्याची भाषा करुन स्वत:च्या पक्षाच्या पदरात काहीतरी पाडून घेण्याचा या राजकीय पक्षांचा हा केविलवाणा प्रयत्न होता.
नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होताच भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे हे काही अपक्षांना घेऊन नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी पुढे सरसावले. त्यासाठी अपक्ष नगरसेवकांची खरेदी विक्रीही सुरु झाली. भाजपाचे १०, काँग्रेसचे ८, राष्ट्रवादीचे ५, मनसेचे २ असे एकुण २५ नगरसेवकांना एकत्रित करुन आघाडी तयार केली. आता बहुमताचा २९ आकडा गाठण्यासाठी चढाओढ सुरु झाली. ६ अपक्षांपैकी काही अपक्षांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न या आघाडीच्या वतीने सुरू होते. शिवसेनेला सत्तेपासून दूर सारण्याचे मनसुबे विरोधी पक्षातील घटकपक्षांनी पाहिले होते.
परंतु त्यातील काही नेत्यांनी स्वत:ची पोळी भाजून घेण्यासाठी आणि आपल्या पदरात काहीतरी पद पाडुन घेण्यासाठी आघाडीचा विचार न करताच परस्पर सेनेशी संपर्क साधला. त्यात राष्ट्रवादीने तर उघडपणे शिवसेनेला समर्थन देऊन त्यांच्यापुढे लोटांगण घातले. भाजपानेही विकासाचे नाव पुढे करीत शिवसेनेला समर्थन दिले.
तर मनसेने देखील वरिष्ठ पातळीवर शिवसेनेशी चर्चा करुन गप्प बसणे पसंत केले. आता केवळ काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात धन्यता मानत आहे.

बदलापुरातही विरोधी पक्षात कोण?
४बदलापूरातही काही प्रमाणात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या काळात शिवसेना आणि भाजपा हे एकमेकांवर आग ओकत असतांना सत्तेची गणिते शिवसेनेच्या बाजुने लागताच भाजपाची बोली बदललेली दिसत आहे.
४बहुमत असतांनाही शिवसेनेनेही मन मोठे करुन बिनशर्त पाठिंबा देण्याचे आवाहन भाजपाला केले. या आवाहनाला भाजपाच्या नगरसेवकांनीही साथ देत शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका कोण आणि कशी बजावणार हे बदलापुरात अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विकासासाठी सर्वच पक्षांनी सत्ताधा-यांना समर्थन देऊन शहराचा विकास साधता येणार नाही. शहराचा विकास साधण्यासाठी सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्षाची भूमीका काँग्रेस जबाबदारीने सांभाळेल.
- प्रदिप पाटील,
गटनेते काँग्रेस.

अंंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत ५७ पैकी २६ जागा ह्या शिवसेनेने जिंकल्या. बहुमताचा आकडा २९ असल्याने शिवसेना ६ पैकी काही नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार हे निश्चित होते. म्हणून शिवसेनेला आव्हान देण्यासाठी कोणताच पक्ष पुढे सरसावला नाही.

Web Title: Lot of people all over Shiv Sena's power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.