छानछोकीसाठी लाखोंचा गंडा

By admin | Published: September 24, 2015 12:55 AM2015-09-24T00:55:51+5:302015-09-24T00:55:51+5:30

अंधेरी येथील खाजगी ट्युशन क्लासेसमध्ये काम करताना विद्यार्थ्यांकडून गोळा केलेली साडेपाच लाखांहून अधिक फीची रक्कम घेऊन पसार झालेल्या शमा बुधवाणी

Lots of millions of things to look for | छानछोकीसाठी लाखोंचा गंडा

छानछोकीसाठी लाखोंचा गंडा

Next

मुंबई : अंधेरी येथील खाजगी ट्युशन क्लासेसमध्ये काम करताना विद्यार्थ्यांकडून गोळा केलेली साडेपाच लाखांहून अधिक फीची रक्कम घेऊन पसार झालेल्या शमा बुधवाणी या युवतीला अंधेरी पोलिसांनी अटक केली. तिला २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
शशी सेहगल हे अंधेरी येथील ओल्ड नगरदास रोडवर आयडीयल एज्युकेशन क्लासेस चालवतात. आरोपी शम्शा ऊर्फ शमा बुधवाणी हिला सेहगल यांनी मदतनीस म्हणून कामाला ठेवले होते. तिच्यावर विद्यार्थ्यांकडून धनादेश अथवा रोखीने घेतलेली फीची रक्कम बँकेत भरण्याची जबाबदारी होती. वर्षभरापूर्वी सेहगल यांनी क्लासेसचा हिशेब तपासला असता विद्यार्थ्यांकडून स्कीकारलेले धनादेश बँकेत भरण्यात आले असले तरी रोख स्वरूपात घेतलेली फीची रक्कम बँकेत भरण्यात आली नसल्याचे आढळले. ज्यांनी रोखीने फी भरली होती त्यांना पावत्या देण्यात आल्या होत्या. याबाबत सेहगल यांनी विचारणा केली असता विद्यार्थ्यांची रक्कम आपण हडप केल्याची कबुली तिने दिली. घेतलेल्या रकमेपैकी एक लाख रुपये तिने सेहगल यांना परत केले आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे कबूल करून तिने ती नोकरी सोडली.
त्यानंतर शमा बुधवाणी सेहगल यांना सातत्याने ईमेल पाठवून रक्कम देण्याचे आश्वासन देत राहिली. काही दिवसांनी तिने संपर्कही तोडला. या फसवणुकीबाबत सेहगल यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून प्रकरण वरिष्ठांकडे पाठवले. याबाबत गुन्हा दाखल होत नसल्याचे पाहून राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी याबाबत माहिती अधिकारामार्फत तपासाची माहिती मागितली. दरम्यान, पोलीस उपायुक्तांच्या आदेशावरून अंधेरी पोलिसांनी शमा बुधवाणी हिचा मोबाइल ट्रॅक करून तिचे लोकशन शोधत तिला अटक केली. तिचे आईवडील अमेरिकेत राहत असून छानछोकीसाठी तिने सेहगल यांची रक्कम हडप केल्याचे आढळले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lots of millions of things to look for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.