म्हाडाच्या कोकण मंडळांची लॉटरी फुटली, सोडतीला अल्प प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 05:26 AM2018-08-26T05:26:58+5:302018-08-26T05:27:24+5:30

म्हाडाच्या कोकण विभागाची लॉटरी अखेरीस शनिवारी फुटली. ९०१८ घरांमधूून १७३६ घरांसाठी एकही आॅनलाइन अर्ज दाखल झाला नाही.

 Lottery flutter in Kokan Mandals of MHADA, low response to drawback | म्हाडाच्या कोकण मंडळांची लॉटरी फुटली, सोडतीला अल्प प्रतिसाद

म्हाडाच्या कोकण मंडळांची लॉटरी फुटली, सोडतीला अल्प प्रतिसाद

Next

मुंबई : म्हाडाच्या कोकण विभागाची लॉटरी अखेरीस शनिवारी फुटली. ९०१८ घरांमधूून १७३६ घरांसाठी एकही आॅनलाइन अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे लॉटरीच्या दिवशी प्रत्यक्षात ७२८२ घरांचीच लॉटरी जाहीर झाली. तर लॉटरी सुरू होण्यापूर्वीच काही गटांमध्ये घरांच्या संख्येपेक्षा अर्जच कमी आल्याने ७५४ अर्जदारांना लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच घरे जाहीर झाली. यामुळे कोकण विभागीय मंडळाच्या या वर्षीच्या लॉटरीला मिळालेला हा थंड प्रतिसाद लॉटरीच्या दिवशीही कायम राहिला. त्यात भर म्हणून खुद्द गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांनीही लॉटरीला मिळालेल्या अल्प प्रतिसादाबद्दल चिंता व्यक्त केली.

१७३६ घरांसाठी अर्जच आले नाहीत : सोडतीला अल्प प्रतिसाद, ७५४ अर्जदार आधीच ठरले विजयी

सकाळी १० वाजता म्हाडा मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा सभागृहात गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि मुंबई उपनगरचे पालकमंंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत कोकण विभागाच्या लॉटरीचा शुभारंभ झाला.
आतापर्यंत लॉटरी ही रंगशारदा सभागृहात ढोल-ताशांच्या गजरात होत असे. प्रत्येक वेळी अर्जदार सभागृहात तुडुंब गर्दी करत असत. पण या वेळी म्हाडाने खर्चावर नियंत्रण आणत लॉटरी मुख्यालयातच आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्याचा निर्णय घेतला. तसेच लॉटरी ऐकण्यासाठी आलेल्या अर्जदारांसा़ठी तळमजल्यात मंडप उभारून, एलईडी स्क्रीन लावून लॉटरी पाहण्याची व्यवस्था केली होती. मात्र लॉटरी आॅनलाइन असल्याने आणि अर्जदारांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्याने मंडपातही अर्जदारांची तुरळक गर्दी दिसत होती.



असा मिळाला प्रतिसाद
च्संकेत क्रमांक २५४, मीरा रोड, अत्यल्प गटातील अनुसूचित जातीतील गटातील १४ घरांसाठी सर्वप्रथम काढण्यात आली लॉटरी. 

च्रंजन व्यास या ठरल्या २०१८ च्या कोकण विभागाच्या पहिल्या विजेत्या.

खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती या वर्गातून लॉटरीला चांगला प्रतिसाद. बाकी सर्व गटांमध्ये कोकण विभागीय लॉटरीला अर्जदारांनी दाखवली पाठ.
ठाणे, मीरा रोड,विरार-बोळिंज या मुंबईच्या आसपासच्या भागातील असूनही तिथल्या घरांना अर्जदारांनी दिला अल्प प्रतिसाद.

पहिल्या प्रयत्नात स्वप्न साकार, तर अनेक प्रयत्न करूनही अपयश

वांद्रे पूर्वेकडील म्हाडा कार्यालयात म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९ हजार १८ घरांची लॉटरी शनिवारी जाहीर झाली. यंदा तरी घर मिळेल, या आशेने सतत प्रयत्न करणारे आणि पहिल्यांदा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांची कार्यालयाच्या पटांगणात मोठी गर्दी जमली होती. काहींना घरे मिळाली, याचा आनंद त्यांच्या चेहºयावर दिसत होता. तर दरवर्षी प्रयत्न करूनही या वर्षी घर मिळाले नाही, याचे दु:ख असणारे चेहरेही दिसत होते. मुंबईमध्ये आपले घर असावे, असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते. लॉटरीच्या निमित्ताने काही जणांचे स्वप्न साकार झाले, तर काही जणांच्या पदरी निराशाच आली.

राजेश साखरकर हे म्हाडा विभागात शिपाई पदावर कार्यरत असून, त्यांना १० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर लॉटरीत घर मिळाले. राजेश हे कांदिवलीमध्ये राहतात. आता त्यांना म्हाडाकडून कल्याण येथे घर मिळाले. मुंबईमध्ये हक्काचे घर झाले, याचा फारच आनंद आहे, परंतु कामावर ये-जा करण्यासाठी प्रवासाचा त्रास सहन करावा लागणार आहे, असे साखरकर यांनी सांगितले.

विजेत्या दीपाली गवई म्हणाल्या की, ‘मी कामानिमित्त औरंगाबाद येथे राहते, तर पती पनवेलमध्ये एका कंपनीमध्ये काम करतात. मुंबईत स्वत:च्या हक्काचे घर नाही. पहिल्यांदा म्हाडाच्या लॉटरीमध्ये अर्ज केला होता. नशिबाने साथ दिल्याने पहिल्याच फटक्यात म्हाडाचे घर मिळाले. मुंबईत कमी दरात घर मिळाले, हे स्वप्न साकार झाले.’

मी ठाण्यात राहतो. म्हाडाच्या घरासाठी आजवर तीन वेळा प्रयत्न केला होता, परंतु प्रत्येकवेळी अपयशच पदरात आले. पण, निराश न होता यंदाही प्रयत्न केला होता, परंतु या वेळीही घर मिळाले नाही. जोपर्यंत म्हाडाचे घर मिळणार नाही, तोपर्यंत प्रयत्न करतच राहणार आहे, असे हेमंत शेलार यांनी सांगितले.

उत्तम व्यवस्था
म्हाडाच्या सोडत लॉटरीसाठी म्हाडा कार्यालयात नागरिकांसाठी उत्तम सोय करण्यात आली होती. मुख्य निकाल हा कार्यालयाच्या तिसºया मजल्यावर सुरू होता. परंतु नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी म्हाडा कार्यालयाच्या पटांगणात एलईडी टीव्ही लावण्यात आला होता, तसेच बैठक व्यवस्थाही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

कलाकार कोट्यामध्ये डोंबिवली येथे राहणारे अविनाश देशमुख यांना म्हाडाचे घर लागले. अविनाश हे चित्रकार आहेत. गेल्या चार वर्षांपासून लॉटरीमध्ये प्रयत्न करत होते. घर हे आपले हक्क आहे, ते मिळालाच पाहिजे. जागेची कमतरता आणि वाढत्या जमिनीचे भाव, यामुळे मुंबईत घर घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. परंतु आता आम्हाला घर मिळाले याचा खूप आनंद आहे, अशी माहिती अविनाश देशमुख यांनी दिली.

५५,३२४ पात्र अर्जांतून या विजेत्या लॉटरी अर्जदारांना निवडण्यात आले. मात्र कोकण विभागातील अनेक घरांना लोकांनी नाकारल्याने या लॉटरीला अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे. विरार-बोळिंज, ठाणे, मीरा रोड या भागातील घरांच्या अवाजवी किमती, उच्च उत्पन्न गटाला लॉटरीत मिळालेले झुकते माप यामुळे तब्बल १७३६ घरांसाठी एकही अर्जदार लाभलेला नव्हता. त्यामुळे इतर गटांतील विजेते न ठरलेले आणि प्रतीक्षा यादीत नाव आलेल्या अर्जदारांना आता या १७३६ राहिलेली घरे म्हाडा उपलब्ध करून देणार आहे. मात्र आधीच अर्ज न आलेल्या या घरांना प्रतीक्षा यादीतील किती अर्जदार प्रतिसाद देतील यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे.
च्त

तर या लॉटरीतील ७५४ घरांना मर्यादित अर्जदारांनी अर्ज भरल्याने उरलेल्या अर्जदारांना लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच घरे मिळाली. यावरूनच कोकण विभागाच्या लॉटरीसाठी लोकांमध्ये किती उत्साह होता हे चित्र दिसून येते. याविषयी प्रकाश मेहता म्हणाले की, हाडाच्या कोकण विभागाच्या लॉटरीसाठी कमी आॅनलाइन अर्ज आले हे मान्य आहे. मात्र या वेळी लोकांचा प्रतिसाद का कमी मिळाला, याविषयी मी स्वत: माहिती घेणार आहे. घरे जास्त असूनही लोकांनी का पाठ फिरवली, आम्ही कुठे कमी पडलो यासाठी म्हाडा अधिकाºयांसोबत तातडीची बैठक घेऊन माहिती घेणार असल्याचे मेहता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title:  Lottery flutter in Kokan Mandals of MHADA, low response to drawback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.