Join us  

गिरणी कामगारांच्या २,६३४ घरांसाठी ९ मे रोजी लॉटरी

By admin | Published: April 22, 2016 3:27 AM

हक्काच्या घरांसाठी मंत्रालयात येरझाऱ्या घालणाऱ्या गिरणी कामगारांना म्हाडाने दिलासादायक बातमी दिली आहे. ९ मे रोजी सकाळी वाजता १० वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात गिरणी

मुंबई : हक्काच्या घरांसाठी मंत्रालयात येरझाऱ्या घालणाऱ्या गिरणी कामगारांना म्हाडाने दिलासादायक बातमी दिली आहे. ९ मे रोजी सकाळी वाजता १० वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात गिरणी कामगारांसाठीच्या २ हजार ६३४ घरांकरिता लॉटरी काढण्यात येणार आहे.एकूण सहा गिरण्यांच्या गिरणी कामगारांच्या सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार आहे. या गिरण्यांमध्ये भारत मिल, वेस्टर्न इंडिया मिल, सेंच्युरी मिल, प्रकाश कॉटन मिल, रुबी मिल आणि स्वान मिल ज्युबलीचा समावेश आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सहा गिरण्यांच्या गिरणी कामगारांच्या माहितीप्रमाणेच अर्जदारांची सोडत काढण्यात येईल. लॉटरी, निश्चिती आणि सदनिका वितरणाची कार्यवाही शासनाच्या आदेशानुसार केली जाईल. ज्या गिरणी कामगाराने ज्या गिरणी संकेत क्रमाकांची माहिती दिली आहे; त्याच संकेत क्रमांकासाठी अर्जदाराची सोडत काढली जाईल. गिरणी कामगार पती/पत्नी/वारसांपैकी मूळ गिरणी कामगार अथवा त्यांच्या वारसांचा एकाच सदनिकेसाठी विचार करण्यात येणार आहे. एकापेक्षा अधिक अर्जांचा वितरणासाठी विचार केला जाणार नाही. प्रलोभनांना बळी पडू नकासंगणकीय सोडतीमध्ये कोणत्याही प्रकाराचा मानवी हस्तक्षेप होऊ शकत नाही, म्हाडाने दलाल नेमलेले नाहीत. त्यामुळे अर्जदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे. लॉटरीमध्ये यशस्वी झालेल्या अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतरच सदनिकेची किंमत/मुद्रांक शुल्क/सेवाशुल्क अर्जदाराला भरणे बंधनकारक असेल आणि अर्ज भरलेल्या पावतीची पोच व ओळखपत्रासह गिरणी कामगारांनी लॉटरीदिवशी उपस्थित राहावे, असेही म्हाडातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.