Join us  

म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशांची लॉटरी उत्साहात

By सचिन लुंगसे | Published: December 28, 2023 7:49 PM

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मास्टर लिस्टवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील २६५ पात्र भाडेकरू-रहिवासी यांना सदनिकांचे वितरण करण्यासाठी यांच्या हस्ते गुरुवारी पहिल्यांदा लॉटरी काढण्यात आली.

मुंबई - मास्टर लिस्टवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू/रहिवासी यांना पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळी घरे लॉटरी द्वारे देण्यात येत असून वर्षानुवर्षे संक्रमण गाळ्यात राहणार्‍या भाडेकरू/रहिवासी यांना मुंबईच्या हृदयस्थानी आपले हक्काचे घर मिळाले याचा आनंद असल्याचे मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मास्टर लिस्टवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील २६५ पात्र भाडेकरू-रहिवासी यांना सदनिकांचे वितरण करण्यासाठी यांच्या हस्ते गुरुवारी पहिल्यांदा लॉटरी काढण्यात आली. यावेळी मिलिंद शंभरकर बोलत होते. ते म्हणाले की, ऐतिहासिक निर्णयामुळे घरे देण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक, गतिमान झाली असून प्रक्रियेत सुसूत्रता येणार असून भाडेकरू/रहिवासी यांच्या तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे.

३०० चौरस फूटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारक १८ पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना त्यांच्या मागणीनुसार ४५० चौरस फूट वाढीव क्षेत्रफळाची सदनिका देण्यात आली.

३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या जुन्या सदनिकाधारक ५२ पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना त्यांच्या विनंतीनुसार ३०० चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका विनामूल्य वितरित करण्यात आली. या गटात १०८ सदनिका वितरणासाठी उपलब्ध होत्या.

३०० चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा कमी आकारमानाच्या १७२ जुन्या पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना ३०१ ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित करण्यात आली.

३०१ ते ४०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या १० जुन्या पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना ४०१ ते ५०० चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित करण्यात आली. या गटात ८२ सदनिका वितरणासाठी उपलब्ध होत्या.

४०१ ते ५०० चौरस फुट क्षेत्रफळाच्या ५ जुन्या सदनिकाधारक पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना ५०० ते ६०० चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका वितरित करण्यात आली.

५०१ ते ६०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या ५ जुन्या पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना ६०१ ते ७०० चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका वितरित करण्यात आली.

६०१ ते ७५३ चौरस फूट क्षेत्रफळापेक्षा अधिक आकारमानाच्या ७ पात्र भाडेकरू/ रहिवाशी यांना ७५३ चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका वितरित करण्यात आली.

टॅग्स :म्हाडामुंबई