मुंबई : वर्ष संपत आले तरी म्हाडाच्या कोकण मंडळाला ५ हजार ३११ घरांची लॉटरी काढण्यासाठी अद्याप मुहुर्त मिळालेला नाही. १३ डिसेंबर रोजी लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा म्हाडाने केली होती. प्रत्यक्षात मात्र प्रशासकीय कारणात्सव लॉटरी पुढे ढकलण्यात आल्याचे ८ डिसेंबर रोजी म्हाडाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर अद्याप कोकण मंडळाच्या लॉटरीची दिनांक जाहीर करण्यात आलेली नाही. कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांना याबाबत लॉटरीच्या दिनाकांबाबत विचारले असता गुरुवारी कोकण मंडळाच्या लॉटरीची घोषणा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. लॉटरी याचवर्षी काढली जाईल की नव्या वर्षात काढली जाईल ? हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. कुठे आहेत घरेठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग लॉटरीची दिनांक अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला होता. एकूण ३०,६८७ अर्ज प्राप्त झाले होते. अनामत रकमेसह २४३०३ अर्ज प्राप्त झाले.
- प्रधामंत्री आवास योजनेअंतर्गत १०१० घरे
- एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १०३७ घरे
- सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ घरे
- टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनसाठी ६७ घरे