Loudspeaker Row In Maharashtra: मुंबईतील २६ मशिदींच्या मौलवींचा मोठा निर्णय, पहाटेची अजान भोंग्याविना होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 08:23 AM2022-05-05T08:23:35+5:302022-05-05T08:24:03+5:30

Loudspeaker Row In Maharashtra: राज्यातील मशिदींवरील भोंग्यांवरुन मनसेनं आंदोलन पुकारलेलं असताना मुंबईतील मौलवींनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

loudspeaker row in maharashtra mumbai muslim religious leader announcement on azan | Loudspeaker Row In Maharashtra: मुंबईतील २६ मशिदींच्या मौलवींचा मोठा निर्णय, पहाटेची अजान भोंग्याविना होणार

Loudspeaker Row In Maharashtra: मुंबईतील २६ मशिदींच्या मौलवींचा मोठा निर्णय, पहाटेची अजान भोंग्याविना होणार

googlenewsNext

मुंबई-

Loudspeaker Row In Maharashtra: राज्यातील मशिदींवरील भोंग्यांवरुन मनसेनं आंदोलन पुकारलेलं असताना मुंबईतील मौलवींनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवींनी पहाटेची अजान भोंग्यांविना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

बुधवारी रात्री उशिरा दक्षिण मुंबईतील जवळपास २६ मशिदींच्या मौलवी आणि धर्मगुरूंची बैठक झाली. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत यापुढे पहाटेची अजान लाउडस्पीकर शिवाय केली जाईल असा ठराव संमत करण्यात आला. 'सुन्नी बडी मशिदी'मध्ये या संदर्भातील बैठक घेण्यात आली होती. यात भायखळाच्या मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा येथील मुस्लीम धर्मगुरू सहभागी झाले होते. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर न करता मशिदींमध्ये अजान केली जाईल असं बैठकीत ठरविण्यात आलं. या निर्णयाचं पालन करत मुंबईतील प्रसिद्ध मिनारा मशिदीत पहाटेची अजान आज लाऊडस्पीकर विना करण्यात आली आहे. 

राज ठाकरेंचा इशारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरके यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आंदोलन पुकारलं असून ज्या मशिदीवर भोंग्यांवरुन अजान दिली जाईल त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाईल असा इशारा दिला आहे. राज्यात कालपासून मनसेच्या या आंदोलनाला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर गृह विभाग देखील अलर्ट मोडवरुन असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असं राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आहे. 

दुसरीकडे राज ठाकरे यांनीही काल दुपारी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं आहे. तसंच मुंबईत एकूण १३५ मशिदींनी कायद्याचं उल्लंघन करत पहाटेची अजान भोंग्यांवर दिली असल्याची माहिती दिली. फक्त आमच्याच कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार का? नियम मोडणाऱ्या या मशिदींविरोधात कारवाई केली जाणार की नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसंच मशिदींवरील भोंगे जोपर्यंत हटवले जात नाहीत तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरू राहील असंही त्यांनी काल जाहीर केलं आहे.  

Web Title: loudspeaker row in maharashtra mumbai muslim religious leader announcement on azan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.