‘लव्हर्स पार्क’ नको रे बाबा!

By admin | Published: February 14, 2017 04:37 AM2017-02-14T04:37:52+5:302017-02-14T04:37:52+5:30

‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे कपल्सचा दिवस. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. डेटिंगचा दिवस. हे सर्व तरुणाईचे ‘फॅड’ असल्याचा गैरसमज अनेकांनी करून घेतला आहे.

'Lover's Park', Do not Rake Baba! | ‘लव्हर्स पार्क’ नको रे बाबा!

‘लव्हर्स पार्क’ नको रे बाबा!

Next

पूजा दामले / स्नेहा मोरे ल्ल मुंबई
‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे कपल्सचा दिवस. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. डेटिंगचा दिवस. हे सर्व तरुणाईचे ‘फॅड’ असल्याचा गैरसमज अनेकांनी करून घेतला आहे. व्हॅलेंटाइन डेवरून तरुणाईला अनेक गोष्टी ऐकवल्या जातात. प्रत्यक्षात मात्र या प्रेम दिवसाबद्दल तरुणाईची मते अगदीच वेगळी आहेत. व्हॅलेंटाइन
डे हा प्रेमाचा दिवस असून, हे प्रेम
फक्त गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डसाठी मर्यादित नाही. प्रेमाच्या सगळ्या रूपांना समर्पित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात
असल्याचे तरुणाईचे मत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्रेम, नातेसंबंध, ब्रेकअप,
लव्हर्स पार्क याविषयी जाणून घेतलेली ही मते...
‘प्रेम म्हणजे दिन की चाँदनी’
मुंबई शहर नेहमीच गजबजलेले असते. इथे दोन क्षण निवांत घालवायला मिळणे कठीण. अनेक जणांना असा एकांत हवा असतो. म्हणून लव्हर्स पार्क असावेत. पण, हा एकांत देण्यासाठी जागा कुठून देणार, असाही प्रश्न आहे. त्यामुळे लव्हर्स पार्क मुंबईत नकोच. ‘व्हॅलेंटाइन डे’ आल्यावर सगळ्या चर्चा होतात. पण, खरं म्हणजे प्रेमासाठी एक दिवस कशाला हवा? प्रेम कधीही व्यक्त करू शकतो. आणि हे प्रेम गर्लफ्रेण्ड, बॉयफ्रेण्डपुरते मर्यादित का असावे? आमच्या ‘हॅशटॅग’ गु्रपमध्ये कोणीही रिलेशनशिपमध्ये नाही. पण, आमचे मैत्रीतले प्रेम आहे. आम्ही एकत्र येतो, सेलीब्रेशन करतो, तो आमच्यासाठी प्रेमाचा दिवस आहे. रिलेशन आता फारशी सीरियस नसतात. आताच्या काही रिलेशनशिप या टाइमपास असतात. पहिले सहा महिने खूप महत्त्वाचे असतात. या वेळेत एकमेकाला इंप्रेस करणे, गिफ्ट्स देणे असे होते. नंतर प्रेम ओसरते आणि प्रयत्नही कमी होतात. अनेकांचे प्रेम चार दिन की चाँदनी असते. पण, उलट काही जणांचा बॉण्ड खूप घट्ट असतो.
- एमजीएम महाविद्यालय (हॅशटॅग ग्रुप)
(सहभाग : ओम्कार महाजन, शुभम् हांडे, गणेश आंधळे, ऋचिता गायकवाड)
आजकालच्या रिलेशनशिप टाइमपाससाठी
प्रेम म्हणजे मैत्री. प्रेम म्हणजे भावना. हृदयापासून प्रेम केले पाहिजे, प्रेम करताना चेहरा, त्याचे-तिचे दिसणे बघून प्रेम केले जात नाही. प्रेमाची अनेक रुपे आहेत. प्रेम हे मैत्रीतही असते. त्यामुळे ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणजे प्रेम असणाऱ्या व्यक्तींवर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. या एकाच दिवशी का गिफ्ट्स देऊन अथवा याच आठवड्यात का प्रेम साजरे करावे? प्रत्येक दिवस हा प्रेमाचा दिवस असतो. ‘व्हॅलेंटाइन डे’ हा कुटुंबाबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर, भावंडांबरोबर साजरा केला जाऊ शकतो, खरे म्हणजे तरुणाई साजरा करते. आजकालच्या रिलेशनशिप या अनेकदा टाइमपाससाठी असतात. पण, खऱ्या नसतात असे नाही. आता प्रेम झाले की लगेच ब्रेकअपही होतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी हक्काची जागा असली पाहिजे. लव्हर्स पार्क हवे. पण, खरं म्हणजे याबाबत वैयक्तिक मतमतांतरे असू शकतात. काहींना नकोही आहेत.
- एसआयडब्ल्यूएस महाविद्यालय
(सहभाग : प्रशांत बोथरे, सागर उथळे, ज्योती पुरीबुवा, श्रृती कदम, प्रताप नाडार, कुसुम विश्वकर्मा, अखिलेश गुप्ता)
‘प्रेम तर खाजगी, मग ‘लव्हर्स पार्क’ कशासाठी?’
रिलेशनशिप आता सीरियस नसतात? आधी असायच्या असे काळानुसार ठरवू शकत नाही. प्रत्येक काळात सर्व प्रकारच्या रिलेशनशिप होत्या आणि आहेत. पण, आता सोशल नेटवर्किंग साईट्समुळे या गोष्टी पटकन सगळ्यांसमोर येतात. आधी असे होत नव्हते. त्यामुळे कोण कोणाबरोबर आहे हे कळून येत नाही. पण, अजून एक गंमत आहे म्हणजे आता असे वाटते की ब्रेकअप जास्त होतात. कारण, गाणी म्हणा किंवा अन्य ठिकाणी प्रेमापेक्षा ब्रेकअपला अधिक चलती असते. ब्रेकअप होणे आणि त्यानंतरचा वेळ हा एक फेज असतो. तुमचे रिलेशन किती घट्ट होते - नव्हते यावर हा फेज किती असेल हे ठरते. आजकाल ‘रिबॉण्ड’ ही टर्म नवीन आहे. एक रिलेशनशिप तुटल्यावर त्यातून बाहेर येण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये जाणे. व्हॅलेंटाइन डे हा फक्त ‘लव्हर्स’साठी नसतो. पण, या दिवशी मुला-मुलींना एकत्र पाहिले की लगेच तर्कवितर्क काढले जातात. फ्रेण्ड, कुटुंबाबरोबर सेलीब्रेट करू शकतो. प्रेम हे खासगी असते. त्यामुळे चारचौघांसमोर व्यक्त करण्यासाठी लव्हर्स पार्क नकोत.
- नालंदा नृत्य कला महाविद्यालय
(सहभाग : चैत्राली दळवी, भक्ती महाजन, उन्नती अजमेरा, निशिता गमरे)

Web Title: 'Lover's Park', Do not Rake Baba!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.