‘व्हॉट्सअ‍ॅप’ वाली लव्हस्टोरी

By admin | Published: February 10, 2016 04:07 AM2016-02-10T04:07:20+5:302016-02-10T04:07:20+5:30

जेव्हापासून व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन आले आहे, तेव्हापासून आतापर्यंत कित्येक प्रेमकहाण्यांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप महत्त्वाचे ठरले आहे. अनेकदा प्रेम जुळण्याचे कारण व्हॉट्सअ‍ॅप ठरते

Lovestory with 'Whatsapp' | ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वाली लव्हस्टोरी

‘व्हॉट्सअ‍ॅप’ वाली लव्हस्टोरी

Next

- नथनेल रणदिवे,  मुंबई
जेव्हापासून व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप्लिकेशन आले आहे, तेव्हापासून आतापर्यंत कित्येक प्रेमकहाण्यांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप महत्त्वाचे ठरले आहे. अनेकदा प्रेम जुळण्याचे कारण व्हॉट्सअ‍ॅप ठरते, तर प्रेमाचा ‘द एंड’ ही व्हॉट्सअ‍ॅपमुळे होतो. याच ‘व्हॉट्सअ‍ॅपवाली लव्हस्टोरी’ची ही झलक...
हल्ली कॉलेजच्या प्रत्येक मुला-मुलीकडे अँड्राइड फोन असतो. नुकत्याच कॉलेजात पदार्पण करणाऱ्या तरुण-तरुणींची ओळख वाढवण्याची स्टाईलही हल्ली बदलली आहे. पूर्वी ‘हाय, हॅलो!’, ‘तुझे नाव काय?’ असे विचारले जायचे. मोबाइल असले, तरी फोन नंबर कसा मागायचा, यासाठी तरुण-तरुणी फार विचार करत, पण व्हॉट्सअ‍ॅपच्या कृपेमुळे आता ते शक्य झाले आहे. कोणत्याही मुलीला नाव, गाव, पत्ता असे काही विचारण्याच्या भानगडीत न पडता, तरुण-तरुणी, ‘ व्हॉट्सअ‍ॅपवर आहेस का?’ असा प्रश्न विचारतात आणि नंबर मिळवतात, त्यामुळे फ्रेंडशिप करणे अगदी सहज झालेय, त्यातूनच पुढे ‘व्हॉट्सअ‍ॅपवाली लव्हस्टोरी’त रंग भरायला सुरुवात होते.
एकदा फेंडशिप झाली की, मग सकाळच्या ‘गुड मॉर्निंग’पासून ते रात्रीच्या ‘गुड नाइट’पर्यंत हे सत्र सुरूच राहते. एखाद्या आवडलेल्या मुलाला किंवा मुलीला आलेल्या कविता, शायरी कॉपी पेस्ट करत राहणे. तासन्तास व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून हवा तेवढा वेळ चॅट करणे.
मॅसेज फटाफट जाण्यासाठी चांगला नेट पॅक शोधणे, असे सुरूच होते. त्यातून मुलगा- मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडले की, डीपी आणि स्टेटस ठेऊन रिलेशनशिपमध्ये असल्याचा आनंद व्यक्त केला जातो आणि सगळ्या कॉलेजभर रिलेशनशिपची आपोआप चर्चा सुरू होते.
मग एका मागोमाग एकत्र डीपी, प्रेम व्यक्त करणारे स्टेटस तासातासाने बदलत जातात आणि फाटाफूट झाली की, हेच स्टेटस डीपी उपयोगात येतात. त्यातल्या त्यात एखाद्याला आयुष्यातून काढून टाकण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने दिलेला ‘ब्लॉक’ करण्याचा पर्याय अनेक जण अवलंबतात.
एकंदरच व्हॉट्सअ‍ॅपमुळे सुरू झालेली ही ‘व्हॉट्सअ‍ॅपवाली लव्हस्टोरी’ कधी-कधी सुरू मोठ्या उत्साहात होते, पण तुटताना डीपी, स्टेटसच्या माध्यमातून काही काळ तरी चटका देऊन जाते.

स्टेटस, डीपीची मजा!
व्हॉटअ‍ॅपमधील डीपी आणि स्टेटसमुळे तुमच्या आयुष्यात काय घडते, ते मित्र-मैत्रिणींना सहज कळते. दिवस चांगला गेला, तर हसरा डीपी आणि आनंद व्यक्त करणारे स्माइली स्टेटसवर असतात, तर जराशी फाटाफूट झाली, ‘डीएनडी’, ब्रोकन हार्ट आणि रडवेल्या चेहऱ्याचे डीपी ठेऊन भावना व्यक्त केल्या जातात.

Web Title: Lovestory with 'Whatsapp'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.