खार भागात दोन दिवस कमी दाबाने पाणी
By जयंत होवाळ | Published: February 15, 2024 08:09 PM2024-02-15T20:09:12+5:302024-02-15T20:09:16+5:30
१६ व १७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर ६०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई: खार 'एच -पश्चिम' परिसरात पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर ६०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याने १६ व १७ फेब्रुवारी रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे मुंबई महापालिकेने कळवले आहे. त्यामुळे पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१६ व १७ फेब्रुवारी या कालावधीमध्ये पाली हिल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीवर ६०० मिलीमीटर व्यासाची झडप बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन दिवसात एच पश्चिम विभागातील पाली गाव, नवी कांतवाडी, शेरली राजन, च्युईम गाव, पाली पठार झोपडपट्टी, डॉ. आंबेडकर मार्ग लगतच्या झोपडपट्टया, गझधर बंध भाग, दांडपाडा, १६ वा रस्ता व २१ वा रस्ता यांच्यातील खार पश्चिमेचा भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरु होईल.