Join us

दहिसर, कांदिवलीमध्ये ९ जानेवारीला कमी दाबाने पाणीपुरवठा; काय असेल कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 9:45 AM

९ जानेवारी रोजी पश्चिम उपनगरात अनेक परिसरांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा  होणार आहे.

मुंबई : पालिकेच्या बोरिवली पूर्व येथील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक ०२ चे स्ट्रक्चरल ऑडिट ९ जानेवारीला करण्यात येणार आहे. हे काम दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत  होणार असल्याने हा जलाशय पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून रिक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे ९ जानेवारी रोजी पश्चिम उपनगरात अनेक परिसरांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा  होणार आहे.

जलाशय क्रमांक २ रिक्त केल्यानंतर ३ क्रमांकाच्या जलाशयातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे.  काम पूर्ण झाल्यावर ही पुढील दोन दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे अशा सूचना पालिकेकडून करण्यात आल्या आहेत.

आनंदनगर, आशिष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजीनगर, भाबलीपाडा, परागनगर, लिंकमार्ग, गोवणमार्ग,  छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुधींद्र नगर, देवयानी संकुल, महालक्ष्मी आणि सरस्वती संकुल, शक्तीनगर, सद्गुरू छाया ले-आऊट बंगाली पाडा, महाकाली वाडी, मातृछाया गल्ली, दहीसर भुयारी मार्ग, आनंदनगर (अंशत:), तरे कुंपण, अवधूतनगर, वर्धमान औद्योगिक परिसर, सी. एस. मार्ग, दहिसर पोलिस स्थानक परिसर, किसान नगर, वर्धमान औद्योगिक परिसर, डायमंड इंडस्ट्री, नॅशनल मिल कुंपण, रामाणी कुंपण, केतकीपाडा ऑनलाइन पंपिंग, दहिसर (पूर्व).  

या परिसरांमध्ये होणार कमी दाबाने पुरवठा :

आर / दक्षिण: महिंद्रा आणि महिंद्रा, गुंदेचा ठाकूर गांव व  समता नगर-सरोवा संकुल,  कांदिवली (पूर्व). रोजच्या पाणीपुरवठ्याची वेळ - संध्याकाळी ६:२५ ते रात्री ८:२५

आर / मध्य : ला-बेल्लेजा व ला-वेस्टा, बोरिवली (पूर्व). रोजच्या पाणीपुरवठ्याची वेळ संध्याकाळी ५:३० ते संध्याकाळी  ७:३०

आर / उत्तर : शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एन. जी. उद्यान, रिव्हर उद्यान, गावडे नगर, भोईर नगर, मिनी नगर, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, ज्ञानेश्वर नगर, कोकणीपाडा, संत नामदेव मार्ग, वाघदेवी नगर, केशव नगर,  राधाकृष्ण नगर, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, मेंदोडा कुंपण, भोईर कुंपण, सिद्धनाथ मिश्रा कुंपण, संत मीराबाई मार्ग, राज नगर, सुयोग नगर, वैशाली नगर, नरेंद्र संकुल. रोजच्या पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी ४:४० ते संध्याकाळी ७:४०  

टॅग्स :मुंबईपाणी टंचाई