कनिष्ठ स्तरांवरील न्यायालये दोन शिफ्टमध्ये काम करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 02:57 AM2020-09-19T02:57:06+5:302020-09-19T02:57:25+5:30

‘कोणतेही वकील किंवा पक्ष हेतुपुरस्सर गैरहजर राहिल्याचे लक्षात आल्यास, न्यायालयीन अधिकारी योग्य आदेश देऊ शकतात,’ असे परिपत्रकात म्हटले आहे.

The lower level courts will operate in two shifts | कनिष्ठ स्तरांवरील न्यायालये दोन शिफ्टमध्ये काम करणार

कनिष्ठ स्तरांवरील न्यायालये दोन शिफ्टमध्ये काम करणार

Next

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने प्रमाणित कार्यप्रणालीत बदल करून सर्व कनिष्ठ स्तरावरील न्यायालयांना दोन शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्देश दिले. यासंबंधी जारी करण्यात आलेल्या पत्रकाची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येईल.
‘कोणतेही वकील किंवा पक्ष हेतुपुरस्सर गैरहजर राहिल्याचे लक्षात आल्यास, न्यायालयीन अधिकारी योग्य आदेश देऊ शकतात,’ असे परिपत्रकात म्हटले आहे.
कनिष्ठ स्तरावरील न्यायालयांची पहिली शिफ्ट सकाळी १०.३० ते दुपारी १.३०, तर दुसरी शिफ्ट दुपारी २ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत असेल. या कामकाजाच्या वेळेत पत्नी, मुले, पालक देखभालीच्या खर्चासंबंधी दाखल अर्ज, सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने काही खटले ठरावीक कालावधीत निकाली काढण्याचे आदेश दिले असतील, तर त्यावरीलसुनावणी प्राधान्याने घ्यावी, ज्या प्रकरणांत आरोपी तीन किंवा त्याहून अधिक वर्षे कारागृहात आहे आणि दंडाधिकारी न्यायालयापुढे सुरू असलेल्या खटल्यांतील जे आरोपी सहा महिने किंवा अधिक काळ कारागृहात आहेत आदी खटल्यांवरील सुनावणी घ्यावी, असे निर्देश आहेत.

Web Title: The lower level courts will operate in two shifts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.