लोअर परळचा पूल खुला होण्यास उजाडणार मे-२०२२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:14 AM2021-02-20T04:14:33+5:302021-02-20T04:14:33+5:30

मुंबई : लोअर परळ येथील पुलाचे काम रेल्वे आणि महापालिका यांच्याद्वारे करण्यात येत आहे डिलायलरोड ओव्हर ब्रीजच्या (आरओबी) ...

Lower Parel bridge to be opened in May 2022 | लोअर परळचा पूल खुला होण्यास उजाडणार मे-२०२२

लोअर परळचा पूल खुला होण्यास उजाडणार मे-२०२२

Next

मुंबई : लोअर परळ येथील पुलाचे काम रेल्वे आणि महापालिका यांच्याद्वारे करण्यात येत आहे डिलायलरोड ओव्हर ब्रीजच्या (आरओबी) पुनर्बांधणीसाठी रेल्वे रुळांवर गर्डर टाकण्यात येणार आहेत,एप्रिल २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा होती; मात्र हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास मे २०२२ उजाडणार आहे.

प्रभादेवी आणि अंधेरी येथील गोखले पूल दुर्घटनेनंतर आयआयटी मुंबई, महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाने ४५५ पुलांचे सुरक्षा ऑडिट केले होते. त्यामध्ये लोअर परळचा पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जुलै, २०१८ मध्ये पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करून पाडण्यात आला. महापालिका आणि पश्चिम रेल्वे यांनी संयुक्तरीत्या पुलाचे काम करण्याचा निर्णय घेतला होता.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले, आरओबीच्या रेल्वे भागाचे काम एप्रिल २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या गर्डरच्या एकत्रीकरणाचे काम आणि इतर काम या ठिकाणी सुरू आहे. या कामासाठी आम्हाला ब्लॉक घ्यावा लागणार आहे. पश्चिम रेल्वेने जून २०१९ मध्ये रेल्वे रुळांवरील पुलाचा भाग तोडण्याचे काम हाती घेतले. या पुलाच्या आराखड्याला रिसर्च, स्टँडर्ड्स अँड डिझाइन ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) मार्च २०२० मध्ये मंजुरी दिली होती. आरओबीच्या रेल्वे भागाच्या पुनर्बांधणीचे कंत्राट फेब्रुवारी २०१९ मध्ये ८७ कोटी रुपये देण्यात आले आणि नोव्हेंबर २०१९ मध्ये काम सुरू झाले. कामाचे महत्त्व लक्षात घेता कोरोनाकाळातही काम सुरूच होते.

तसेच पूर्वेकडील बाजू अद्याप पाडण्यात आलेली नाही.११०० मेट्रिक टन (८८ मीटर लांबी, १६ मीटर रुंदी आणि १२ मी. उंची) वजनाचे स्टीलगर्डर सुरू करणे आवश्यक आहे. असे जड गर्डर उचलून क्रेनने सोडता येत नाहीत आणि आरओबीच्या पूर्वेकडून ढकलण्याची गरज आहे, असेही ठाकूर म्हणाले. मार्च २०२१ पर्यंत गर्डर लाँच केल्यानंतर ही पूर्वेकडील बाजू पालिकेला उपलब्ध करून दिली जाईल आणि तोपर्यंत पालिका पश्चिमेकडील दोन ठिकाणी तोडफोड आणि पुनर्बांधणी पूर्ण करू शकेल असेही ठाकूर म्हणाले.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू म्हणाले की, पालिकेने २७ जानेवारी २०२० रोजी पूल पुनर्बांधणीसाठी निविदा मंजूर केली होती.काम संथगतीने सुरू आहे आणि आम्ही लवकरच कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावू. हे एक कठीण काम आहे त्यामुळे आपल्याला काहीवेळ वाट पाहावी लागेल. वाहतुकीच्या समस्यांमुळे आम्ही एकाचवेळी दोन्ही पद्धतींवर काम करू शकत नाही. ते पुढे म्हणाले की, पुलाचे काम संथगतीने सुरू असले तरी लवकरच पुलाचे काम वेगाने सुरू होईल असेही त्यांनी सांगितले. पालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मे २०२१ पर्यंत दोन बाजू आणि तिसऱ्या बाजूचे काम मे २०२२ पर्यंत पूर्ण होईल त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

Web Title: Lower Parel bridge to be opened in May 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.