मुंबई - अंधेरी येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने आता लोअर परळचा रेल्वे पूल धोकादायक असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळेच हा पूल वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी २४ जुलैपासून दुरुस्तीपर्यंत बंद राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सार्वजनिक सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून पूल बंद असल्याने कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.
अंधेरी दुर्घटनेनंतरच्या जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने काही पुलांची पाहणी केली असून या पाहणीत रेल्वे रूळांवरून गेलेल्या लोअर परळसह एकूण सहा उड्डाणपुलांची तातडीने पुनर्बाधणी किंवा दुरुस्तीची गरज आहे, असा निष्कर्ष काढला आहे. त्यापैकी लोअर परळ स्थानकासमोरील ना. म. जोशी मार्ग पुलाच्या दुरुस्तीसाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या. मंगळवारी ६ वाजल्यापासून या पुलाशी जोडलेले रस्ते आणि उड्डाण पूल बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल टाळण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी हा पूल बंद केल्यानंतर या पुलाशी जोडलेला महादेव पालव मार्ग म्हणजेच करी रोड रेल्वे स्थानकासमोरील पुल लालबागच्या दिशेने आणि ना. म. जोशी मार्ग हा चिंचपोकळीच्या दिशेने सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली.
सकाळी 10 वाजता -