किंमती कमी करा आणि घरे लवकर विका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:22 PM2020-04-15T17:22:37+5:302020-04-15T17:23:23+5:30

नामांकीत बँकांचा बांधकाम व्यावसायीकांना सल्ला

Lower prices and build homes faster | किंमती कमी करा आणि घरे लवकर विका

किंमती कमी करा आणि घरे लवकर विका

Next

मुंबई - कोरोनामुळे बांधकाम व्यवसायावर कोसळलेल्या आर्थिक संकटाची धार कमी कराण्यासाठी घरांच्या किंमती कमी करा आणि पूर्ण झालेली घरे तातडीने विका असा सल्ला स्टेट बँक आॅफ इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार आणि एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी बांधकाम व्यावसायीकांना दिला आहे.

देशातील बांधकाम व्यावसायीकांची संघटना असलेल्या नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलने (नरडोको) दोन स्वतंत्र वेबिनारच्या माध्यमातून या बँक अध्यक्षांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भविष्यातील आर्थिक संकटांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांचा उहापोह केला.

पाच वर्षांत घरांच्या किंमती दुप्पट होण्याचे दिवस आता सरले आहेत. बांधकाम व्यवसाय ही दुभती गाय राहिलेली नाही हे मान्य करा. तसेच, आपल्या कार्यपध्दतीत बदल करून लोकांचा या व्यवसायाप्रती असलेला दृष्टिकोन बदला. जी घरे बांधून पूर्ण झाली आहेत ती लवकरात लवकर विका आणि भविष्यात परवडणा-या घरांच्या उभारणीवर भर द्या असे आवाहन रजनीश कुमार यांनी केले. बांधकामांचा खर्च कसा नियंत्रणात ठेवता येईल, काम कमीत कमी वेळात कसे पूर्ण करता येईल, बांधकाम पूर्ण झालेली घरे तातडीने कशी विकता येतील या सर्व आघाड्यांवर व्यावसायीकांनी गांभिर्याने विचार करण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले.

संकटात सापडलेल्या व्यवसायासाठी भांडवल उभारणी गरजेची आहे. मात्र, त्यासाठी अन्य पर्यायांचा मार्ग शोधण्यापूर्वी व्यावसायीकांनी आपल्या पूर्ण झालेल्या इमारतींतली घरे विकून भांडवल उभारणीला प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी त्यांनी घरांच्या किंमती कमी करण्याची तयारी दाखवायला हवी असे मत दीपक पारेख यांनी व्यक्त केले. किंमती कमी झाल्या तर गृहखरेदीत गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कर्ज हे दुधारी तलवारीसारखे असते. प्रगतीच्या काळात ते आपल्यासाठी उपयुक्त ठरत असले तरी संकटाच्या काळात ते मारकही ठरू शकते. त्यामुळे व्यवसाय वृध्दीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला. 

Web Title: Lower prices and build homes faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.