मुंबई : मालेगावमध्ये २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याची निर्दोष मुक्तता करण्याची याचिका सोमवारी हायकोर्टाने फेटाळली.
अधिकृत कर्तव्यावर असल्याने आपल्यावर खटला चालविण्यासाठी भारतीय लष्कराकडून फौजदारी दंडसंहिता प्रक्रिया (सीआरपीसी) १९७ (२) अंतर्गत पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, यंत्रणेने पूर्वपरवानगी न घेताच खटला चालविला, असा दावा करत पुरोहितने मुक्ततेसाठी याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी न्या. अजय गडकरी व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
यावेळी बॉम्बस्फोट घडवणे हे अधिकृत कर्तव्य नाही, असे सुनावत कोर्टाने कर्नल पुरोहितला फैलावर घेतले. त्याबॉम्बस्फोटात सहाजणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिकजण जखमी झाले होते. तो बॉम्बस्फोट का टाळला नाही, असा सवाल न्यायालयाने केला.