Join us

महिलेच्या खोट्या तक्रारीवरुन जिम टे्रनरला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केल्याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

By admin | Published: May 22, 2015 12:40 AM

विनयभंगाच्या खोट्या तक्रारीमध्ये जिम्मी गोंडा या जीम टे्रनरला अडकविल्याप्रकरणी सकपाळ कोंडुळकर यांची चौकशी करण्यात आली होती.

विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविणारे दोन पोलीस निलंबितमुंबई: महिलेच्या खोट्या तक्रारीवरुन जिम टे्रनरला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केल्याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. एपीआय जगन्नाथ कोंडुळकर, पीएसआय रेखा सकपाळ हे यामध्ये दोषी आढळले असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. विनयभंगाच्या खोट्या तक्रारीमध्ये जिम्मी गोंडा या जीम टे्रनरला अडकविल्याप्रकरणी सकपाळ कोंडुळकर यांची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये त्यांच्यासह तक्रारदार महिला सॅमिना उस्मानियासह तिघांना अटक करण्यात आली होती.उस्मानिया या महिलेने २७ मार्च रोजी एका मॉडेल महिलेसोबत जिम्मी गोंडा विरोधात जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दीली होती. जिम्मीने आपले नग्न अवस्थेतेतील फोटो मोबाईलमध्ये ठेवल्याची तक्रार तिने दिली होती. २८ मार्च रोजी जे. जे मार्ग पोलीस ठाण्याचे एपीआय पोपट अव्हाड यांनी गोंडा यांना चौकशी केली असता त्यामध्ये काही तथ्य आढळले नाही. म्हणून आव्हाड यांनी गुन्हा दाखल न करता महिलेला माघारी पाठवले. ५ एप्रिल रोजी उस्मानिया या महिलेने गोंडा यांना कॉल करुन सीएसटी येथील मेट्रो सिनेमाकडे भेटण्यासाठी बोलावले. आपल्याला पुन्हा अडकवेल, या भीतीने गोंडा यांनी तत्काळ भायखळा पोलीस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दिली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे कोंडूळकर आणि सकपाळ यांनी त्यांना कसलीच सूचना न देता गोंडा यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली. गोंडा यांनी मेट्रो सिनेमाजवळ भेटण्याच्या बहाण्याने आपला विनयभंग केल्याची तक्रार महिलेने दिली होती. या गुन्ह्याची शहानिशा न करता कोंडोळकर आणि सकपाळ यांनी गोंडा यांना अटक करत कोठडीत डांबले होते. जामिनावर बाहेर आलेल्या गोंडा यांच्या तक्रारीवरुन दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त कृष्णप्रकाश यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत महिलेने दिलेली तक्रार खोटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार तपासात निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी ११ मे रोजी कोंडुळकर आणि सकपाळ यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.याप्रकरणी तक्रारदार महिला उस्मानियासह, दोघांना अटक करण्यात आली. तर अभिलेखावरील आरोपी असून तिच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात खंडणी, फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)