लगेज स्कॅनर नावालाच!

By Admin | Published: June 18, 2014 03:06 AM2014-06-18T03:06:29+5:302014-06-18T03:06:29+5:30

ठाणे व कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत स्कॅनरसह लगेज तपासणी यंत्रे लावण्यात आली आहेत.

The luggage scanner gets the name! | लगेज स्कॅनर नावालाच!

लगेज स्कॅनर नावालाच!

googlenewsNext

ठाणे : ठाणे व कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत स्कॅनरसह लगेज तपासणी यंत्रे लावण्यात आली आहेत. ही यंत्रणा सुरक्षा यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी की ती अधिक गुंतागुंताची करण्यासाठी लावण्यात आली आहे असा सवाल स्थानकांमधील सुरक्षा व्यवस्थेला पडला आहे.
या दोन्ही स्थानकाचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्याही सुमारे नऊ लाखांच्या घरात आहे. या लोंढ्याची सुरक्षा ठेवतांना सुरक्षा व्यवस्थेच्या नाकी नऊ येतात. त्यात नव्यानेच आणलेली स्कॅनर व लगेज तपासणी यंत्रे ही अद्ययावत सेवेच्या दृष्टीकोनातून योग्य असली तरीही येथील अवैध प्रवेशद्वारांमुळे ती तोकडी पडत आहे. प्रवेशद्वारे पूर्णत: बंद करण्यासाठी उपाययोजना राबविणे अत्यावश्यक असल्याचे सुरक्षा व्यवस्थेने वरिष्ठांना कळवल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वीत होण्याआधीच त्यास खोडा मिळाल्याने प्रवाशांनाही या सेवेचे महत्त्व कळत नसल्याची भावना प्रवासी संघनटनेने ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. कल्याण रेल्वे स्थानकातही चार मुख्य प्रवेशद्वारे आहेत, परंतु, या खेरीज फलाट क्रमांक २ ते ७ मध्ये येण्या-जाण्यासाठी असंख्य प्रवासी अन्य पायवाटांचा वापर करतात. (प्रतिनिधी)

Web Title: The luggage scanner gets the name!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.