कोल्हापूरकर दीपक कुंभारची चमकदार कामगिरी

By admin | Published: January 18, 2016 03:26 AM2016-01-18T03:26:58+5:302016-01-18T03:26:58+5:30

मुंबई मॅरेथॉनमध्ये मी गेली ६ - ७ वर्षे सहभागी होत असून, यंदा मला विशेष आव्हान जाणवले नाही. मात्र, गेल्याच रविवारी भुवनेश्वर मॅरेथॉन धावलो

Luminous performance of Kolhapurkar lamp potter | कोल्हापूरकर दीपक कुंभारची चमकदार कामगिरी

कोल्हापूरकर दीपक कुंभारची चमकदार कामगिरी

Next

मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये मी गेली ६ - ७ वर्षे सहभागी होत असून, यंदा मला विशेष आव्हान जाणवले नाही. मात्र, गेल्याच रविवारी भुवनेश्वर मॅरेथॉन धावलो असल्याने शरीर साथ देईल की नाही, ही एकच भीती होती. सुदैवाने कोणतीही अडचण आली नाही आणि मी बाजी मारली, अशी प्रतिक्रिया मुंबई अर्ध मॅरेथॉनचा विजेता दीपक कुंभार याने ‘लोकमत’ला दिली.
ज्या सहजतेने अर्ध मॅरेथॉनमध्ये विजेतेपद पटकवले, तितक्याच सहजपणे दीपकने आपल्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली. मूळचा कोल्हापूरचा असलेला दीपक आर्मीकडून देशभरातील विविध मॅरेथॉनमध्ये धावतो. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या पुणे आणि गेल्या रविवारी झालेल्या भुवनेश्वर अर्ध मॅरेथॉनमध्ये वर्चस्व गाजवल्यानंतर, दीपकने मुंबई जिंकताना २०१६ सालच्या सुरुवातीलाच शानदरा हॅट्ट्रीक नोंदवली. दखल घेण्याची बाब म्हणजे, गतवर्षी दीपकने सुमारे १५ अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना प्रत्येक स्पर्धेत अव्वल तीन क्रमांकात स्थान पटकावण्याचा पराक्रम केला आहे. कोल्हापूरच्या कोरोची गावचा असलेल्या दीपकचे वयाच्या सातव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले. घरी आई व भाऊ असून, ते गावाला असतात. शेतजमीन नसल्याने आई घरीच असते, तर भाऊ छोटी-मोठी वेल्डिंगची कामे करतो. दीपक विविध मॅरेथॉनमधील बक्षिसांच्या रकमेवर घरचा उदरनिर्वाह करतो. तब्बल १६ वर्षे धावण्याचा अनुभव असलेल्या दीपकला मुंबई मॅरेथॉन बक्षीस रकमेमुळे नाही, तर मोठ्या नावामुळे आकर्षित करते. आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षकांना देताना दीपक म्हणतो की, ‘माझे प्रशिक्षक पांडुरंग मस्कर व ज्यांनी माझ्यातील धावपटू घडवला, ते अनिल पाटील यांच्यामुळे आज मी यशस्वी होत आहे.’

Web Title: Luminous performance of Kolhapurkar lamp potter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.