लम्पीचा प्रकोप, आठ दिवसांतच आठपट वाढ; मुंबईसह १९ जिल्ह्यात पोहोचला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 10:22 AM2022-09-21T10:22:20+5:302022-09-21T10:23:25+5:30

राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्टला जळगावात याची लागण झाली. ११ सप्टेंबरपर्यंत रोग अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, नाशिक, अशा १९ जिल्ह्यांत पाेहोचला

Lumpy's fury, eightfold increase in eight days; Vigilance is needed like Corona | लम्पीचा प्रकोप, आठ दिवसांतच आठपट वाढ; मुंबईसह १९ जिल्ह्यात पोहोचला

लम्पीचा प्रकोप, आठ दिवसांतच आठपट वाढ; मुंबईसह १९ जिल्ह्यात पोहोचला

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई/पुणे : लम्पी हा जनावरांना हाेणारा संसर्गजन्य चर्मरोग राज्यात वेगाने पसरत आहे. अवघ्या आठ दिवसांतच  राेगाने २५ जिल्ह्यांत वेगाने हातपाय पसरले. आठ दिवसांपूर्वी म्हणजेच १२ सप्टेंबरला राज्यात ३१० गावांमध्ये २,१४६ गुरांना बाधा झाली हाेती व ३० गुरांचा मृत्यू झाला हाेता. आठ दिवसांनंतर सोमवारी सायंकाळपर्यंत (१९ सप्टेंबर) राेजी बाधित पशुधनाचा आकडा थेट १० हजारांवर पोहोचला असून, २७१ गुरांचा मृत्यू झाला.  

राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्टला जळगावात याची लागण झाली. ११ सप्टेंबरपर्यंत रोग अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, नाशिक, अशा १९ जिल्ह्यांत पाेहोचला. २७  जिल्ह्यांत ११०८ गावांमध्ये १० हजारांहून अधिक जनावरे बाधित आहेत. बाधितांपैकी ३,२९१ जनावरे बरी झाली आहेत, असे पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे गोरेगाव (मुंबई) येथे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमधील ३ आणि इतर ठिकाणचे मिळून १७ गायींचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यातील पॉझिटिव्ह असणाऱ्या गायींचे विलगीकरण करून उपचार केले आहेत. दोन्ही  गायी उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

झपाट्याने प्रसार
दिनांक    मृत्यू     बाधित
१२ सप्टेंबर     ३०     २,१४६
१९ सप्टेंबर     २७१    १००००+ 
    पशुसंवर्धन विभागाने 
    दिलेली आकडेवारी 

राज्यात जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. ही बाब गंभीर असून, व्याघ्र प्रकल्पात संसर्ग पोहोचू नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.     
    - सुनील लिमये, प्रधान मुख्य 
    वनसंरक्षक, वन्यजीव

मुंबईतही शिरकाव

मुंबई : लम्पीने मुंबईत शिरकाव केला आहे. पुणे येथील रोग अन्वेषण विभागाच्या अहवालानुसार, मुंबईतून पाठविलेल्या नमुन्यांपैकी दोन नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, या आजाराच्या संसर्गाचा धोका माणसांना नसल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

राज्य शासनासह मुंबई पालिकेने लम्पीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यात तबेले, गोशाळा सर्वेक्षणापासून प्राण्यांच्या लसीकरणाची मोहीमही हाती घेतली आहे.  त्यात आजारी आणि संशयित गुरांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यातील दोन नमुने पॉझिटिव्ह असल्याचे पेठे यांनी सांगितले. मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. 

भारतात प्रथम २०२० मध्ये आलेला लम्पीचा आलेला विषाणू आणि आताचा विषाणू बदललेला असल्याचे राजस्थानमध्ये झालेल्या जिनाेम सिक्वेन्सिंगमधून आढळून आलेले आहे. त्याचा संसर्गाचा वेग व अंतर्गत अवयवांना हानीही करत आहे.
    - देवेंद्र जाधव, उपायुक्त, 
    पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र.

Web Title: Lumpy's fury, eightfold increase in eight days; Vigilance is needed like Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.