मुंबई : छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण रविवारी होणार आहे. परंतु ते भारतातून दिसणार नाही, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.चंद्र रविवार ५ जुलै रोजीे सकाळी ८.३४ ते ९.२५ या वेळेत पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेतून जाईल. परंतु त्या वेळी तो आपल्यादृश्य आकाशात नसल्याने हे छायाकल्प चंद्र्रग्रहण भारतातून दिसणार नाही. उत्तरपूर्व भागसोडून आफ्रिका, युरोपचा दक्षिण-पश्चिम भाग, अंटार्क्टिका, उत्तर भाग सोडून अमेरिका, न्यूझीलंड येथून ते दिसेल.त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहणही भारतातून दिसणार नाही. दरम्यान, रविवारी गुरुपौर्णिमा व व्यासपूजन आहे. हे चंद्रग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे गुरुपौर्णिमेच्या उत्सवामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
आज छायाकल्प चंद्रग्रहण; भारतातून मात्र दिसणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 6:20 AM