चिकाटी असली की सगळं शक्य, पण हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका; CM उद्धव ठाकरेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 06:21 PM2022-02-22T18:21:33+5:302022-02-22T18:22:07+5:30

चिकाटी असली की सारंकाही शक्य होतं. मुंबईत घर मिळवण्यासाठी केलेला संघर्ष लक्षात ठेवा आणि हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका अशी माझी अट समजा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना केलं आहे.

m uddhav thackeray addressing patrawala chawl lay foundation stone programme | चिकाटी असली की सगळं शक्य, पण हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका; CM उद्धव ठाकरेंचं आवाहन

चिकाटी असली की सगळं शक्य, पण हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका; CM उद्धव ठाकरेंचं आवाहन

Next

मुंबई

चिकाटी असली की सारंकाही शक्य होतं. मुंबईत घर मिळवण्यासाठी केलेला संघर्ष लक्षात ठेवा आणि हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका अशी माझी अट समजा, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना केलं आहे. ते आज मुंबईतील पत्राचाळ पुनर्विकासाच्या कार्यक्रमात बोलत होते. गोरेगाव येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पत्राचाळ विकास कामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीनं आयोजित करण्यात आला होता आणि यात उद्धव ठाकरे यांच्यासह गृहमंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मंत्री अस्लम शेख यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. 

"पत्राचाळ विकासाचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित होतं. गेली अनेक वर्ष त्याचं दळण दळलं जात होतं. पण प्रश्न काही सुटत नव्हता. अनेकांनी या चाळीच्या विकासासाठी आंदोलनं केली आणि आजचा हा क्षण पाहायला अनेकजण हयातही नाहीत. अडचणी डोंगराएवढ्या आहेत. पण त्या सोडवल्या जाऊ शकतात हे आजचा दिवस याचा उत्तम उदाहरण आहे. प्रकल्प किती जुना आहे याचा पाढा मी आता वाचत बसणार नाही. चिकाटी असेल तर सर्व काही होतं", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

हक्काचं घर विकून मुंबई सोडू नका
"ज्या स्वप्नाची तुम्ही वाट पाहत होता. ते आज सत्यात साकारलं जात आहे. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. हवंतर माझी अट समजा. घरं मिळवण्यासाठी जो संघर्ष केला तो लक्षात ठेवा. तो विसरू नका आणि घर विकून मुंबई सोडून जाऊ नका. तुम्ही जिद्दीनं संघर्ष केला आहे आणि त्यात आता यश येताना पाहायला मिळत आहे. आता घर मिळालं की निदाम आम्हाला चहा प्यायला तरी बोलवा", अशी मिश्लिल टिप्पणी करत उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना घरं न विकण्याच आवाहन देखील केलं.

Web Title: m uddhav thackeray addressing patrawala chawl lay foundation stone programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.