मुंबई अणि मांडवादरम्यान ‘एम2एम-1 रोपॅक्स फेरी सर्व्हिस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 04:27 PM2020-03-15T16:27:29+5:302020-03-15T16:27:45+5:30

'एम2एम फेरिज प्रायव्हेट लिमिटेड’ (एमएफपीएल) ही कंपनी ‘मांडवा पोर्ट एलएलपी’च्या प्रवर्तकांकडून स्थापित करण्यात आली असून ही कंपनी मांडवा येथील प्रवासी टर्मिनलचा विकास, कार्यान्वन आणि व्यवस्थापन पाहते.

'M2M-1 Ropex Ferry Service' between Mumbai and Mandavad | मुंबई अणि मांडवादरम्यान ‘एम2एम-1 रोपॅक्स फेरी सर्व्हिस’

मुंबई अणि मांडवादरम्यान ‘एम2एम-1 रोपॅक्स फेरी सर्व्हिस’

Next

दैनंदिन प्रवासी, रोजगाराच्या प्रतिक्षेत प्रवास करणारे युवक आणि कामानिमित्त मांडवा अणि अलिबागच्या इतर भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता प्रवासाची एक नवीन सुविधा प्राप्त झाली आहे. ‘एम2एम-१ रोपॅक्स फेरी सर्व्हिस’ या नवीन सुविधेला भाऊचा धक्का येथे १५ मार्च २०२० रोजी प्रारंभ करण्यात आला. 

ही रो-पॅक्स बोट ग्रीस येथून मागविण्यात आली असून ’ एम2एम-१’ची बांधणी सप्टेंबर २०१९ मध्ये करण्यात आली आहे. तिची प्रती खेप क्षमता ५०० प्रवासी व १४५ गड्या एवढी आहे. भाऊचा धक्का, मुंबई आणि मांडवा, रायगड दरम्यान बांधण्यात आलेल्या विशेष टर्मिनलदरम्यान ही सेवा दिली जाईल.

'एम2एम फेरिज प्रायव्हेट लिमिटेड’ (एमएफपीएल) ही कंपनी ‘मांडवा पोर्ट एलएलपी’च्या प्रवर्तकांकडून स्थापित करण्यात आली असून ही कंपनी मांडवा येथील प्रवासी टर्मिनलचा विकास, कार्यान्वन आणि व्यवस्थापन पाहते. कंपनीने महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड अणि मुंबई पोर्ट ट्रस्टबरोबर संयुक्त करार केला असून त्या माध्यमातून मुंबईचा जलमार्ग वाहतूकीसाठी वापरला जाणार आहे. त्याद्वारे ‘रोपॅक्स’ फेरी सेवा दखल केली गेली आहे. या सेवेमुळे मुंबईला भारतातील रोपॅक्स सेवा दखल करणारे व त्याद्वारे वाहतूक पायाभूत सुविधा वापरणारे पाहिले महानगर होण्याचा मान मिळाला आहे. 

ही फेरीसेवा मुंबईच्या भाऊचा धक्का टर्मिनल ते मांडवा रोपक्स टर्मिनल दरम्यान खास बनविलेल्या टर्मिनल दरम्यान दर तीन तासांनी उपलब्ध असेल. पहिल्या महिन्यात या सेवेमध्ये मर्यादित खेप असेल. या खेपांचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. या सेवेची एकेरी आणि परतीच्या प्रवासाची तिकिटे भाऊचा धक्का, मुंबई अणि मांडवा जेट्टी, अलीबाग येथे उपलब्ध आहेत. बाहेरील डेकवरील आसनांसाठी २२५ रुपये, आतील वातानुकूलित आसनांसाठी ३३५ रुपये तर व्हीआयपी लाउंजसाठी ५५५ रुपये असा तिकिटदर ठेवण्यात आला आहे.

छोट्या गाडयांसाठी ८८० रुपये, माध्यम आकाराच्या गाड्यांसाठी १३२० रुपये आणि मोठ्या गाड्यांसाठी १७६० रुपये दर ठरविण्यात आला आहे. मोटर सायकलसाठी २२० रुपये टार सायकलसाठी ११० रुपये दर आहे. मिनीबससाठी ३३०० रुपये तारे बससाठी ५५०० रुपये भाड़े असेल. मात्र या फेरीमध्ये बस वाहून नेण्याची सेवा काही महिन्यांनी सुरु होणार आहे. चर्चगेट स्थानक, सीएसटी आणि काही दिवसांनी डॉकयार्ड स्थानक या ठिकाणांहून घेवून जाण्याची व आणण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ही सेवा फेरी तिकिटधारकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध असेल.

मुंबई  ते मांडवादरम्यान आता ग्राहकांना त्यांच्या गाड्या फेरीसेवेमध्ये ठेवून समुद्रातून प्रवास करत केवळ एक तासामध्ये अलीबाग गाठण्याची तसेच अगदी कमी काळात कोकणातील इतर भागांमध्ये पोहोचण्याची सेवा उपलब्ध असल्याने त्या माध्यमातून दुर्गम भागाशी संपर्क अधिक चांगल्या पद्धतीने प्रस्थापित होणार आहे. त्याद्वारे पर्यटन उपक्रमाला चलाना मिलणार असून मुंबईतील रोजगारसंधी सुधारणार आहेत.  आता संपूर्ण वर्षभर आशाप्रकारे प्रवास करणे शक्य होईल.

सध्या मांडवा येथे जाण्यासाठी रस्ते मार्गाने १११ किमीचा प्रवास करावा लागतो अणि त्यासाठी साधारण ५ तास लागतात. त्याला पर्याय म्हणून फेरी/कॅटामरान सेवा तसेच स्पीडबोटचा वापर केला जातो. त्यातील फेरी आणि स्पीडबोट सेवा या मे ते ऑक्टोबर या पावसाळयांच्या महिन्यांमध्ये संपूर्णतः बंद असतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. मात्र त्या तुलनेत ‘एम2एम्-1’ रोपॅक्स फेरी’ सेवा ही संपूर्ण वर्षभर ३६५ दिवस सुरु असणार आहे.

पावसाळ्यामध्येसुद्धा या सेवेमध्ये कोणताही खंड पडणार नाही. त्यामुळे वर्षभरात मुंबईतील गेटवे ऑफ़ इंडिया अणि अलिबाग येथील मांडवादरम्यान प्रवास करणाऱ्या २० लाख प्रवाशांना दिलासा मिळेल. सध्याच्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि अलिबाग येथील मांडवादरम्यान २० लाख प्रवासी प्रवास करतात.    

'रोपॅक्स’ फेरी याद्वारे देशात जो अत्यंत आगळी वेगळी अशी पायाभूत सुविधा घेऊन येत आहे, त्या व्यतिरिक्त त्या माध्यमातून अलिबागमधील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे घातक असे इंधन ज्वलन कमी होणार असून त्यातून होणारे मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.

Web Title: 'M2M-1 Ropex Ferry Service' between Mumbai and Mandavad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई