मुंबई- अंधेरी पश्चिम एमए हायस्कूल प्रशासनाच्या विरोधातील धरणे प्रदर्शन आंदोलनाला शुक्रवारी ५० दिवस पूर्ण झाले. माजी खासदार संजय निरुपम आणि मुबंई काँग्रेस उपाध्यक्ष मोहसीन हैदर आणि नगरसेविका वाॅर्ड क्रमांक -६६ श्रीमती मेहेर मोहसीन हैदर यांच्या नेतृत्वाखाली येथील पालकांनी सलग ५० दिवसांपासून येथे धरणे प्रदर्शन आंदोलन जारी केले आहे.
मुंबई शहरात सर्वांत मोठा लढा टेक्सटाइल मिल्सच्या गिरणी कामगारांनी दि. २८ फेब्रुवारी १९८२ रोजी आपल्या मागण्यांसाठी मिल मालकांविरोधात सलग ४८ दिवस आंदोलन केले होते; परंतु आजपर्यंत कोणत्याही राजकीय पार्टी किंवा एनजीओने शिक्षण किंवा शाळा वाचविण्यासाठी सलग ५० दिवस कोणतेही धरणे प्रदर्शन केले नव्हते. आजच्या आंदोलनाने गिरणी कामगारांच्या आंदोलनाचा रेकाॅर्ड तोडला आहे, असे मोहसीन हैदर यांनी सांगितले.
श्री विलेपार्ले केळवाणी मंडळाने येथील धरणे प्रदर्शन आंदोलन हटविण्यासाठी दिडोशी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश लोकवानी यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने श्री विलेपार्ले केळवणी मंडळ आणि आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकली आणि शनिवारी न्यायालय निर्देश देणार असल्याचे मोहसीन हैदर यांनी सांगितले.