माधव दातार यांचे हृदयविकाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 06:06 AM2020-04-30T06:06:42+5:302020-04-30T06:06:49+5:30

त्यांना कोणताही त्रास नव्हता. परंतु बुधवारी पहाटे अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

Madhav Datar dies of heart attack | माधव दातार यांचे हृदयविकाराने निधन

माधव दातार यांचे हृदयविकाराने निधन

googlenewsNext

मुंबई : आर्थिक प्रश्नाचे अभ्यासक, विश्लेषक माधव दातार यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. ते खारघर येते राहत होते. त्यांना कोणताही त्रास नव्हता. परंतु बुधवारी पहाटे अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
आयडीबीआय बँकेतून माधव दातार हे चीफ जनरल मॅनेजर पदावरुन सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी इंडियन बँक मॅनेजमेंटमध्येही वरिष्ठ पदावर काम केले आहे. अर्थचित्रे, १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध, प्रतीक्षा, फ्युचर आॅफ बँकिंग सेक्टर इन इंडिया इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
विविध परिवर्तनशील चळवळीशी त्यांचा संबंध होता. यासंदर्भातदेखील त्यांनी बरेच प्रभावी लिखाण केले होते. सोबतच समकालीन आर्थिक समस्यांचे समाज आणि राजकारणावर पडणाऱ्या प्रभावासंदर्भात अर्थ आणि अन्वय हा त्यांचा ब्लॉग प्रसिद्ध आहे. याच ब्लॉगवर त्यांनी मंगळवारीच कोरोना संदर्भात लेख लिहिला होता.
भारतीय अर्थव्यवस्थेची त्यांची जाण वाखाणण्याजोगी होती. अनेकांनी त्याबाबत त्यांचे कौतुक केले होते. बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Web Title: Madhav Datar dies of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.