मढची तिसाई बोट समुद्रात बुडाली; इतर नौकांनी वाचवले सात मच्छिमार प्राण

By मनोहर कुंभेजकर | Updated: December 29, 2024 20:29 IST2024-12-29T20:28:07+5:302024-12-29T20:29:31+5:30

परदेशी जहाजाने दिलेल्या धडकेत बोटीचे सुमारे ५० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

Madh's fishing boat sank in the sea; other boats saved the lives of seven fishermen | मढची तिसाई बोट समुद्रात बुडाली; इतर नौकांनी वाचवले सात मच्छिमार प्राण

मढची तिसाई बोट समुद्रात बुडाली; इतर नौकांनी वाचवले सात मच्छिमार प्राण

मुंबई : मालाड पश्चिम मढ कोळीवाडा येथील हेमदीप टिपरी यांच्या मालकीची आयएनडी-एमएच-२-एमएम  ५२५१ या मासेमारी नौकेला शनिवारी (२९ डिसेंबर) मध्यरात्री १२.१० च्या सुमारास उत्तरेपासून सुमारे ७० मैल दूर खोल समुद्रात एका विदेशी मालवाहू जहाजाने टक्कर दिल्याने सदर बोट बुडाली.

या दुर्घटनेत या बोटीचे सुमारे ५० लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तर या बोटीवरील १ तांडेल आणि ६ खलाश्यांना बाजूला मासेमारी करत असलेल्या सवटी ग्रुपच्या नौकांनी वाचवले.

या दुर्घटनेत हेमदीप टिपरी यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक नुकसान कोसळले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सहाय्यता निधीतून या बोट मालकाचे आर्थिक पुनर्वसन करावे अशी मागणी महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना केली आहे.

सवटी ग्रुपच्या आठ बोटीने सदर दुर्घटनाग्रस्त नौका बांधून  आज दुपारी  मढच्या तळपशा बंदरात आणली अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Madh's fishing boat sank in the sea; other boats saved the lives of seven fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.