फेरीवाल्यांची माफियागिरी, बांगूरनगरचे नागरिक त्रस्त : पोलीस आणि महापालिका निष्क्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 07:04 AM2017-09-11T07:04:20+5:302017-09-11T07:04:48+5:30
मालाड येथील चिंचोली बंदर रोडवर काही गुंडांनी फेरीचे अनेक बेकायदेशीर धंदे गेल्या काही वर्षांपासून सुरू ठेवले असून भररस्त्यात थाटलेल्या हातगाड्या आणि ठेल्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. याबाबत महापालिका आणि बांगूरनगर पोलिसांकडे तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
मुंबई : मालाड येथील चिंचोली बंदर रोडवर काही गुंडांनी फेरीचे अनेक बेकायदेशीर धंदे गेल्या काही वर्षांपासून सुरू ठेवले असून भररस्त्यात थाटलेल्या हातगाड्या आणि ठेल्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. याबाबत महापालिका आणि बांगूरनगर पोलिसांकडे तक्रारी करूनही कोणतीच कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
मालाड (पश्चिम) येथील चिंचोली बंदर रोडवरील फायडी रेस्टॉरंट आणि मॅग्नस टॉवरसमोरील परिसर हा महापालिकेच्या पी/उत्तर आणि पी/दक्षिण विभाग कार्यालयांच्या हद्दीवर येतो. या परिसरात संदीप माने याने अनेक हातगाड्या बेकायदेशीरपणे लावल्या आहेत. भर फुटपाथवर तसेच रस्त्यात उभ्या करण्यात येणाºया या हातगाड्यांमुळे कमालीचा त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहतुकीलाही अडथळा होतो, असे नागरिकांनी सांगितले. मात्र महापालिका आणि पोलीस अधिकाºयांचा वरदहस्त असल्याने या हातगाड्या आणि ठेल्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
याबाबत राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन गेली अनेक वर्षे महापालिका आणि पोलिसांसोबत पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र दोन्ही यंत्रणांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. नोव्हेंबर २0१३ ते डिसेंबर २0१३ या कालावधीत मुंबई पोलीस कायद्यांतर्गत एकूण ५२ वेळा या बेकायदा फेरी धंद्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतरही या भागातील फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असे पोलिसांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या पी /दक्षिण विभागातील अनुज्ञापन (अतिक्रमण निर्मूलन) खात्यामार्फत या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर ६ फेब्रुवारी २0१५ रोजी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. तसेच ही जागा निरीक्षणाखाली ठेवण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आल्याचे साहाय्यक पालिका आयुक्तांनी मोहन कृष्णन यांना लेखी कळवले होते. मात्र ही कारवाई फक्त कागदोपत्रीच असते. प्रत्यक्षात सारे नियम धाब्यावर बसवून धंदे सुरू असतात, असे कृष्णन यांनी सांगितले. या अनधिकृत धंद्यांच्या जागेवरून फेरीवाल्यांमध्ये आपापसात भांडणे आणि वाद होत असतात. रात्री उशिरापर्यंत हे सुरू असल्याने गुन्हेगारांचे वावरण्याचे ठिकाण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे़ पालिका व पोलीस नियंत्रण कक्षाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे पोलिसांकडून कानाडोळा केला जातो, असे कृष्णन यांनी नमूद केले. फेरीवाल्यांच्या या माफियागिरीबाबत व महापालिका आणि पोलीस अधिकाºयांकडून त्यांना मिळणाºया संरक्षणाबाबत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, असे निवेदन कृष्णन यांनी मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांना दिले आहे.