मॅजिकवीन ॲपचा नफा ५० टक्क्यांहून अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 14:04 IST2024-12-31T14:03:45+5:302024-12-31T14:04:19+5:30

बेटिंग आणि अवैधरीत्या प्रक्षेपण केल्याप्रकरणी प्रथम अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल झाली होती. मात्र, या प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला.  

Magicwin app profits more than 50 percent | मॅजिकवीन ॲपचा नफा ५० टक्क्यांहून अधिक

मॅजिकवीन ॲपचा नफा ५० टक्क्यांहून अधिक

मुंबई : टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप मॅचचे अवैधरीत्या प्रसारण आणि बेटिंगचा आरोप असलेल्या मॅजिकविन ॲप कंपनीने केलेल्या व्यवहारात कंपनीला ५० टक्क्यांपेक्षा जास्त नफा झाल्याची माहिती ईडीच्या तपासात पुढे आली आहे. या ॲपमध्ये बेटिंग तसेच खेळ खेळण्यासाठी ज्यांनी पैसे भरले होते त्या पैशांपेक्षाही कंपनीला जास्त नफा झाल्याचे आढळले. कंपनीच्या प्रवर्तकांनी हे पैसे परदेशातही पाठवले होते. त्याचादेखील तपास सुरू आहे. 

बेटिंग आणि अवैधरीत्या प्रक्षेपण केल्याप्रकरणी प्रथम अहमदाबाद पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल झाली होती. मात्र, या प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला.  

प्रवर्तक पाकिस्तानी
कंपनीचा प्रवर्तक पाकिस्तानी नागरिक असून, त्याने गेमिंगसाठी हे ॲप सुूरू केल्याचे भासवले. मात्र, या ॲपवरून विविध सामन्यांचे प्रसारण अवैधरीत्या होत होते. तसेच विविध प्रकारचे बेटिंगही सुरू होते. या सशुल्क ॲपच्या माध्यमातून गोळा झालेले पैसे कंपनीच्या प्रवर्तकाने विविध बोगस कंपन्यांमार्फत वळवत क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवले, तर काही रक्कम दुबईलाही पाठवली आहे. 

Web Title: Magicwin app profits more than 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.