Join us

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ने विकासाला गती,  कोट्यवधींचे गुंतवणूक करार होणार

By यदू जोशी | Published: February 04, 2018 1:13 AM

तीन दिवसांच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८’ या परिषदेत राज्यात कोट्यवधी रुपयांच्या औद्योगिक गुंतवणुकीचे करार होणार आहेत. १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणा-या या परिषदेत राज्याच्या चौफेर प्रगतीच्या दृष्टीने चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : तीन दिवसांच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८’ या परिषदेत राज्यात कोट्यवधी रुपयांच्या औद्योगिक गुंतवणुकीचे करार होणार आहेत. १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान होणा-या या परिषदेत राज्याच्या चौफेर प्रगतीच्या दृष्टीने चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जवळपास दररोजच आढावा घेत आहेत. या परिषदेच्या निमित्ताने नामवंत कंपन्या गुंतवणुकीसाठीचे करार करणार आहेत. काही प्रकल्पांसाठी जमीन देण्यासंदर्भात करार होतील. काही प्रकल्पांच्या प्रत्यक्ष उभारणीची घोषणा होणार आहे. त्यात रत्नागिरी रिफायनरी, रिलायन्स जिओचा प्रकल्प, प्रवासी रेल्वे डब्यांचा लातूरमधील प्रकल्प, रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड, अ‍ॅमेझॉन, जेएनपीटीमधील कृषी निर्यात हब, ब्रिटानिया कंपनी, जिनस पेपर, लॉयड स्टील, महिंद्र इलेक्ट्रिकल व्हईकल, होरिबा कंपनी आदींचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन- मॅग्नेटिक महाराष्ट्रचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते एमएमआरडीए ग्राऊंडवर १८ फेब्रुवारीला दुपारी ४ वाजता होईल. सायंकाळी ७.३० ला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची देशविदेशातील बड्या उद्योगपतींबरोबर गुंतवणुकीच्या दृष्टीने बैठक होणार आहे.त्यात रतन टाटा, अझिम प्रेमजी, मुकेश अंबानी, अदी गोदरेज, अजय पिरामल, डॉ.जय हाकू, आनंद महिंद्र, उदय कोटक, बाबा कल्याणी, गौतम अदानी, संजीव मेहता, झियावुदिन मॅगोेदोव्ह, चो हुन-जून, टोनिनो लँबॉगिनी, राहुल बजाज, राकेश मित्तल, पेडर नेल्सन, फिल शॉ, सुनील अडवानी, एडवर्ड मॉन्सर आदींचा समावेश आहे.चर्चासत्रात या विषयांचा समावेश असेलमॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये १९ फेब्रुवारीला विविध चर्चासत्र होतील. त्यात इंटरनेट आणि स्मार्ट सिटी, निर्यातभिमुख औद्योगिकीकरण, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, रोजगार या विषयांचा समावेश असेल. २० फेब्रुवारीला जलसंवर्धन, महिला उद्योजकता, ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस, मुंबई एक आर्थिक हब, माध्यमे : माहिती आणि मनोरंजन, रोजगाराभिमुख उद्योगांची निर्मिती आदी विषयांचा समावेश असेल.

 

टॅग्स :महाराष्ट्र