...म्हणून वाघाला अस्तित्वासाठी झुंज द्यावी लागतेय- राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 11:36 AM2019-07-29T11:36:27+5:302019-07-29T11:36:38+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवसेंदिवस वाघांची घटत असलेल्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे.

The magnificent Tiger is our national animal and yet he is fighting for his survival - Raj Thackeray | ...म्हणून वाघाला अस्तित्वासाठी झुंज द्यावी लागतेय- राज ठाकरे

...म्हणून वाघाला अस्तित्वासाठी झुंज द्यावी लागतेय- राज ठाकरे

googlenewsNext

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवसेंदिवस वाघांची घटत असलेल्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्तानं त्यांनी वाघांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी ट्विटरच्या माध्यमातून वाघांच्या संवर्धनासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. ते म्हणाले, वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे, पण तोच प्राणी आज अस्तित्वसाठी झुंज देतोय. ह्याला कारण म्हणजे वाघांची होणारी बेबंद शिकार आणि मानवी वस्तीत वाघ आणि मानव ह्यांच्यात होणारा संघर्ष आहे.

वाघासारखा प्राणी खरंतर मानवी वस्तीपासून जास्तीत जास्त दूर राहायचा प्रयत्न करतो, पण आपणच त्याच्या वस्तीवर आक्रमण करत आहोत. हे लवकरात लवकर थांबायला हवं. वाघांची गणना व्हायलाच हवी, पण फक्त तेवढ्यावर न थांबता जंगलांवर मानवाचं होणारं अधिक्रमण कठोरपणे थांबवायला हवं, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच वाघांचं संवर्धन केलं नाही तर वाघासारखा डौलदार प्राणी, पुढच्या पिढ्यांना फक्त पुस्तकात आणि जुन्या चित्रफितीत बघायला लागेल, असंही राज ठाकरेंनी सांगितलं आहे. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्तानं मोदींनी आज जनतेला संबोधित केलं होतं. जगात वाघांची घटती संख्या चिंताजनक असल्याचं मोदी म्हणाले आहेत. सद्यस्थितीत भारतात फक्त 3 हजार वाघ आहेत. मोदींनी अखिल भारतीय व्याघ्र अंदाज 2018 जारी केला आहे. या रिपोर्टनुसार, 2014च्या तुलनेत वाघांची संख्या 741नं वाढली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या माहितीनुसार, 2014च्या शेवटी झालेल्या जनगणनेनुसार भारतात 2226 वाघ होते, जे 2010च्या तुलनेत जास्त आहेत. देशभरात सध्या 2 हजार 967 वाघ आहेत.  

Web Title: The magnificent Tiger is our national animal and yet he is fighting for his survival - Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.