Join us

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 1:37 PM

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (22 जानेवारी) झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (22 जानेवारी) झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला खर्च एमएमआरडीए करणार असून नंतर सरकार तो खर्च देणार आहे. 

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (22 जानेवारी) झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्मारकाचं बांधकाम एमएमआरडीए करणार आहे. सुरुवातीला खर्च एमएमआरडीए करणार असून नंतर सरकार तो खर्च देणार आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांची बुधवारी म्हणजेच 23 जानेवारीला जयंती आहे. जयंतीनिमित्ताने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गणेशपूजन कार्यक्रम होणार आहे. तसेच महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याची जागा काही दिवसांपूर्वी अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या तळघरात (अंडरग्राऊड) होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कोणत्याही प्रकारे तोडफोड किंवा येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे याआधी स्पष्ट झाले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्व विभागाकडून 'ब' दर्जा मिळालेला आहे. त्यामुळेच या वास्तूचे जतन करुन त्याचे पर्यटनात रुपांतर होणार आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतला आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य महत्त्वाचे निर्णय

1. दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय.

2. मुंबई शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबविण्यास मान्यता.

3. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या स्वायत्त संस्थेचे रुपांतर फर्ग्युसन युनिव्हर्सिटीमध्ये करण्यास मान्यता.

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेशिवसेना