Join us

देवगडच्या 'या' मुलीला काल शिक्का मिळाला अन् तिचा हात आज असा झाला- नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 4:05 PM

बरेच जण गावाला जायच्या मार्गावर आहे. पण गावी जाण्यासाठीही अनेकांना ई-पास घ्यावा लागतोय. ई-पास मिळाल्यानंतर गावी जाता येत आहे.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे.मुंबई, पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, राज्य सरकारही त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.मुंबईत अनेक चाकरमानी गल्लीबोळात छोट्याशा खोलीत राहत असल्यानं कोरोना संसर्गाची भीती आहे.

मुंबईः कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण सापडत आहेत. मुंबई, पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून, राज्य सरकारही त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईत अनेक चाकरमानी गल्लीबोळात छोट्याशा खोलीत राहत असल्यानं कोरोना संसर्गाची भीती आहे.  त्यामुळे बरेच जण गावाला जायच्या मार्गावर आहे. पण गावी जाण्यासाठीही अनेकांना ई-पास घ्यावा लागतोय. ई-पास मिळाल्यानंतर गावी जाता येत आहे.असंच एक दोन बहिणींसह कुटुंब मुंबईहून देवगडला गेलं. काल त्यांची गाडी सकाळी 12.30 वाजता खारेपाटण इथे पोहोचली, तब्बल 9 तासांनी त्यांचा नंबर लागला. तिथे त्यांची आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले, आज सकाळी त्यांच्या हाताची ही अवस्था बिकट झाली होती, तसेच त्यांच्या हातावर फोड आले असून, हात काळा पडला आहे. त्यावरूनच भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. खारेपाटण सीमा सिंधुदुर्ग ओलांडताना लोकांकडून स्टॅम्पवर असेच घडत आहे! काल देवगडच्या 'या' मुलीला शिक्का मिळाला आणि आज सकाळी तिचा हात असा झाला! महासरकार फक्त आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत आहे !! फेड अप !!, असं म्हणत नितेश राणेंनी टीकास्त्र सोडलं आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लष्करात तीन वर्ष ट्रेनिंग देण्याच्या उपक्रमाचे आनंद महिंद्रांकडून समर्थन; म्हणाले...

Coronavirus : त्यांना कर्ज देणारं पॅकेज नको, तर खिशात पैसा द्या, राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

कौतुकास्पद! एका रुपयात इडली विकणार्‍या अम्माला शेफ विकास खन्नांचं सरप्राईज गिफ्ट

गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पाक राबवत असलेल्या योजनांना भारताचा विरोध; इम्रान सरकारला दिला गंभीर इशारा

Lockdown 4.0चं काऊंटडाऊन; आपल्या राज्याला कुठल्या सवलती मिळणार?

CoronaVirus news : कोरोनाच्या समूह संसर्गाची भीती, लॉकडाऊन हटवणं पडू शकतं महागात- तज्ज्ञ

CoronaVirus news : केंद्राच्या धरसोडवृत्तीमुळेच देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय; अमोल कोल्हेंची मोदी सरकारवर टीका

अमेरिका मैत्रीला जागला! भारताला व्हेंटिलेटर देणार अन् मिळून कोरोनाला हरवणार

प्रवासी मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला ट्रकची धडक, 24 जणांचा मृत्यू

...म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, शिवसेनेचा भाजपाला टोला

टॅग्स :नीतेश राणे कोरोना वायरस बातम्या