Join us

कल्याणमध्ये उभारणार 'महा हब'; मुख्यमंत्र्यांची घोषणा, निधीचीही तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 7:29 PM

तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

मुंबई - महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारित ‘महा हब’ साकारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न झाली. ठाणे जिल्ह्याच्या कल्याण येथील अंतार्ली गावात हे ‘महा हब’ साकारण्यात येणार असून त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील स्टार्टअपची संख्या वाढावी, तसेच उद्योजकांना एका छताखाली स्टार्ट अप आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांची पोषक वातावरण मिळावे ही महा हबची प्रमुख संकल्पना आहे. यासाठी उद्योग विभाग यासह कौशल्य, रोजगार उदयोजकता व नावीन्यता विभाग, माहिती तंत्रज्ञान यांच्यासह इतर विभाग एकत्रितपणे काम करणार आहे. ठाणे, कल्याण या परिसरात मजबूत उद्योजकीय इको सिस्टीम तयार करण्यासाठी काम करण्यात येणार आहे. 

खासदार श्रीकांत शिंदे, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञानचे प्रधान सचिव पराग जैन- नानौटिया, माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्यासह महा हबचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबईकल्याण