Join us

मविआच्या जागावाटपाचे घोडे अडल्याने संभ्रम; १५ जागांबाबत घोळ, बैठकीला मुहूर्त मिळेना 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 6:15 AM

मित्रपक्षांसह ठाकरे गट २३, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादीला ९-१० जागा देण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना तब्बल १५ जागांवर घोडे अडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावानंतर राज्यातील फिस्कटलेल्या लोकसभेच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीला बैठकीसाठी मुहूर्त अद्याप मिळालेला नाही. मित्रपक्षांसह शिवसेना (ठाकरे गट) २३, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादीला ९-१० जागा देण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना तब्बल १५ जागांवर घोडे अडले आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना ठाकरे गटात मतभेद असल्याचा दावा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा लावल्याने संभ्रम अधिकच गडद झाला आहे. 

जागावाटपासाठी ९ मार्च, त्यानंतर १२ मार्चची तारीख ठरली, मात्र प्रत्यक्षात बैठकच झाली नाही. शेवटची बैठक ६ मार्चला पार पडली. वंचित बहुजन आघाडीने प्रस्ताव दिला, त्यावर एकमत न झाल्याने नव्याने प्रस्ताव मागवला. आंबेडकरांकडून तर तीन पक्षांनी जागावाटप निश्चित करून  आमच्याशी चर्चा करावी अशी भूमिका घेतली. मात्र, नंतर आंबेडकर यांच्याकडून पुन्हा या तिन्ही पक्षात एकमत होत नसल्याचा गौप्यस्फोट केल्याने संभ्रमात भर पडली आहे. 

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४महाविकास आघाडी